________________
चिंता
सांगतो, कि या संसारात कोणी मनुष्य असा जन्माला नाही आला कि ज्याला संडासला जाण्यासाठी स्वतंत्र शक्ति आहे. तर मग या लोकांनां इगोइझम करण्यात काय अर्थ आहे? ही दुसरी शक्ति काम करत आहे. आता ती शक्ति आपली नाही. ती परशक्ति आहे, आणि स्वशक्तिला जाणत नाही. म्हणून स्वत:ही परशक्तिच्या आधीन आहे; आणि फक्त आधीन नाही पराधीन आहे. सारा अवतारच पराधीन आहे.
मुलीच्या लग्नाची चिंता असे आहे ना कि आमच्या इथे मुलगी तीन वर्षाची होते तेव्हापासून विचार करू लागतात कि ही मोठी झाली, ही मोठी झाली. लग्न तर वीसाव्या वर्षी होते पण लहान असते तेव्हापासून चिंता करायला सुरूवात करतात. मुलीच्या लग्नाची चिंता केव्हा सुरू करायची, असे कुठल्या शास्त्रात लिहिलेले आहे? आणि वीसाव्या वर्षी लग्न आहे, तर आपल्याला चिंता केव्हा सुरू केली पाहिजे? दोन-तीन वर्षाची असेल तेव्हापासून?
प्रश्नकर्ता : मुलगी चौदा-पंधरा वर्षाची होते, तेव्हा तर आई-वडील विचार करतात ना?
दादाश्री : नाही. तरी पण पाच वर्ष राहिली ना !! त्यां पाच वर्षात चिंता करणारा मरुन गेला किंवा जीची चिंता करतो, ती मरुन गेली, याचा काय भरोसा? पाच वर्ष बाकी राहिलीत, त्याच्या आधी चिंता कशी करू शकता?
तरी पण दूसऱ्यांचे बघता बघता फलाना भाऊ बघा मुलीच्या लग्नाची किती चिंता करतो, आणि मला तर चिंताच नाही ! मग चिंतेच्या चिंतेत टरबूजा सारखा होऊन जातो. आणि मुलीच्या लग्नाची वेळ येते तेव्हा हातात चार आणे पण नसतात. चिंता करणारा कुठुन पैसा आणणार?
आपल्याला चिंता कधी केली पाहिजे कि, जेव्हा आजूबाजूचे लोक म्हणतील कि, 'मुलीचे काही केले?' तेव्हा आपण समजावे कि आता विचार