________________
चिंता आहे. मासे तेलात तळतात असा तडफडाट तडफडाट होत आहे!!! याला जीवन कसे म्हणणार?
____ 'मी करतो' म्हणून चिंता प्रश्नकर्ता : चिंता नाही झाली पाहिजे त्याचे भान होणे, हे चिंतेचे दुसरे रूप नाही?
दादाश्री : नाही. चिंता तर इगोइझम आहे, केवल इगोइझम. आपल्या स्वरूपापासून वेगळे होऊन ते इगोइझम करतात कि मीच चालवणारा आहे. संडासला जायला शक्ति नाही आणि 'मी चालवतो' असे म्हणतात.
चिंता तोच अहंकार. या छोट्या मुलाला चिंता का नाही होत? कारण तो जाणतो कि मी नाही चालवत. कोण चालवतो, त्याची त्याला पडलीच नाही. 'मी करतो, मी करतो' असे करत राहतात, म्हणून चिंता होते.
चिंता सगळ्यात मोठा अहंकार प्रश्नकर्ता : चिंता अहंकाराची निशाणी आहे, याला जरा समजवा.
दादाश्री : चिंता अहंकाराची निशाणी का म्हणतात? कारण त्याच्या मनात असे येते कि मीच याला चालवतो आहे म्हणून त्याला चिंता होते. याला चालवणारा मीच आहे म्हणून मग तो या मुलींचे काय होईल? या मुलांचे काय होईल? हे काम पूर्ण नाही झाले तर काय होईल? या चिंता आपल्या डोक्यावर घेतो. स्वतः स्वत:ला कर्ता समजतो कि, मीच मालक आहे आणि मीच करतो. पण तो स्वतः कर्ता नाही आणि व्यर्थ चिंता ओढून घेतो.
__संसारात आहात आणि चिंतेत आहात, आणि चिंता नाही मिटली तर मग त्याला कितीतरी अवतार करावे लागतात. कारण चिंतेनेच अवतार बांधतात.
थोडक्यात एक गोष्ट आपल्याला सांगतो. एक सूक्ष्म गोष्ट आपल्याला