________________
चिंता
जिथे चिंता, तिथे अनुभूति कुठुन? प्रश्नकर्ता : चिंतेपासून मुक्त होण्यासाठी भगवानकडे आशीर्वाद मागतो कि, यातून मी कधी सुटणार, म्हणून 'भगवान, भगवान' करतो, या माध्यमातून आपण पुढे जाऊ इच्छितो. तरी पण मला आपल्या आतला भगवानची अनुभूति नाही होत.
दादाश्री : कशी होणार अनुभूति? चिंतेत अनुभूति नाही होत. चिंता आणि अनुभूति दोन्ही एकत्र नाही होत. चिंता बंद झाल्यावर अनुभूति होणार.
प्रश्नकर्ता : चिंता कशाप्रकारे मिटेल? दादाश्री : इथे सत्संगात राहिल्याने. सत्संगात आलात कधी? प्रश्नकर्ता : दुसऱ्या ठिकाणी सत्संगात जातो.
दादाश्री : सत्संगात जाण्याने जर चिंता बंद नाही होत, तर तो सत्संग सोडला पाहिजे? बाकी सत्संगात गेल्याने चिंता बंद झालीच पाहिजे.
प्रश्नकर्ता : तिथे बसतो, तितका वेळ शांति राहते...
दादाश्री : नाही, त्याला शांति नाही म्हणत. त्यात शांति नाही. अशी शांति तर गप्पा ऐकल्यावरही मिळेल. खरी शांति तर कायम राहिली पाहिजे, हललीच नाही पाहिजे. अर्थात् चिंता असेल त्या सत्संगात जायचेच कशाला? सत्संगवाल्याना सांगा कि, 'साहेब, आम्हाला चिंता होते, म्हणून आम्ही आता इथे येणार नाही. किंवा आपण काही असे औषधोपचार करा कि, आम्हाला चिंता नाही होणार.'
प्रश्नकर्ता : ऑफिसला जा, घरी जा, तरी पण कुठे मन लागत नाही.
दादाश्री : ऑफिसला तर आपण नोकरीसाठी जातो, आणि पगार तर हवा ना? घर-गृहस्थी चालवायची आहे, म्हणजे घर नाही सोडायचे, नोकरी सुद्धा नाही सोडायची. पण केवळ जिथे चिंता नाही मिटत तो सत्संग