________________
चिंता
चिंता येते कुठुन? दादाश्री : कधी चिंता केली आहे का?
प्रश्नकर्ता : चिंता तर मानव स्वभाव आहे, म्हणून एक या दुसऱ्या स्वरूपात चिंता असतेच.
दादाश्री : मनुष्याचा स्वभाव कसा आहे कि, स्वत:ला कोणी थप्पड मारली, तर त्याला समोर थप्पड मारणार. पण जर कोणी समजदार असेल तर तो विचार करेल कि मला कायदा हातात नाही घेतला पाहिजे. काही लोकं कायदा हातात घेतात. याला गुन्हा म्हणतात. चिंता कशी करू शकतो मनुष्य? प्रत्येक भगवान असे सांगून गेले कि कोणीही चिंता करू नका. सगळी जिम्मेदारी आमच्या डोक्यावर ठेवा.
प्रश्नकर्ता : पण सांगणे आणि व्यवहारात आणणे, दोन्हीं मध्ये बरेच अंतर आहे.
दादाश्री : नाही, मी व्यवहारात सोडायला नाही सांगत, हे तर विस्ताराने वर्णन करतो, अशी काही चिंता सुटत नाही, पण ही चिंता नाही करायची. तरी पण चिंता होतेच सगळ्यांना.
आता ही चिंता झाल्यावर काय उपाय करतात? चिंतेचे औषध नाही येत?