________________ आई-वडील आणि मुलांचा व्यवहार लागते आणि नंतर मग आपण स्लिप होतो (घसरतो). आता आपल्याकडे ते हत्यारच नाही आहे ना! त्याच्याकडे तर ते हत्यार आहे, म्हणून भले तो वापरो! परंतु 'व्यवस्थितशक्ति' आहे ना! म्हणून शेवटी त्याचे हत्यार त्याच्यावरच पलटते, अशी 'व्यवस्थितशक्ति' आहे !! तिला सर्व समज आत फिट होऊन गेली. दादाजींनी ड्रॉईंग करुन दिली. मला म्हणाली, 'अशी ड्रॉईंग सांगायची होती का?' मी सांगितले, 'होय असे ड्रोईंग.' मानले पाहिजे या मुलीला! मग त्या मुलीने तिच्या आई-वडीलांना हे सर्व सांगितले. ते ऐकून तिचे वडील जे डॉक्टर होते, ते दर्शन करायला आले. पहा, दादाजींना काही वेळ लागतो का ? मशरूर सारखे येथे यायला हवेत! आली तर ऑपरेशन होऊन गेले झटपट ! पहा, तेथे सारखी दादाजी, दादाजी, म्हणून दररोज आठवण करते ना! सर्वांचे काम होऊन जाईल. आमचे एक-एक शब्द त्वरित समाधान करणारे आहेत. ते शेवटी मोक्षपर्यंत घेऊन जातात! तुम्ही फक्त 'एडजस्ट एवरीव्हेर' करत रहा. 19. जगामध्ये सुखाची साधना, सेवेने जी व्यक्ति आई-वडीलांचे दोष पहाते, त्याची कधीही उन्नती होत नाही. झाला तर पैसेवाला होईल, परंतु त्याची आध्यात्मिक उन्नती कधीही होत नाही. आई-वडीलांचे दोष पहायचे नाहीत. त्यांचे उपकार तर कसे विसरू शकतो? कोणी चहा पाजला असेल तरी सुद्धा त्याचे उपकार विसरू शकत नाही, तर मग आपण आई-वडीलांचे उपकार कसे विसरू शकतो? ___तुला समजले का? हो..., अर्थात् तुला त्यांचे खूप उपकार मानले पाहिजेत, आई-वडीलांची खूप सेवा करायला पाहिजे. ते उलट-सुलट बोलले तरीही आपण लक्ष द्यायला नको. ते भले उलट-सुलट बोलले पण आपण दुर्लक्ष करायचे कारण ते मोठे आहेत ना! की मग तुला पण त्यांना उलट-सुलट बोलायला हवे का?