________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृतत्रैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ६२८.
LALTE
NVR
रात्री ध्रुवतारा दर्शनानन्तरे विद्वद्विशिष्टबन्धुजनैश्च सभापूजा ॥ चतुदिने वधूवरयोरपि महास्नानानि च स्नपनार्चनाहोमादिकं कृत्वा तालीबन्धनं कुर्यात् ॥
अर्थ - रात्री ध्रुवाची चांदणी वधूवरांनी अवलोकन केल्यानंतर विद्वान्, शिष्ट आणि आप्त इष्ट ह्या मंडळीचा सत्कार करावा. विवाह झालेल्या दिवसापासून चवथ्या दिवशीं वधूवराला महास्नान ( चौक न्हाण) घालावें. मग जिनेंद्राचें स्नपन, अर्चन, होम वगैरें कम संपल्यावर तालीबंधन ( मंगलसूत्रबंधन ) करावें. तद्यथा- वरेण दत्ता सौवर्णी हरिद्रासूत्रग्रन्थिता ॥
ताली करोतु जायाया अवतंसश्रियं सदा ।। १६१ ।।
ॐ एतस्याः पाणिगृहीत्यास्तालीं बनामि इयं नित्यमवतंसलक्ष्मीं विदध्यात् ॥ इति कन्याकण्ठे तालीबन्धमन्त्रः ॥
अर्थ — तें असें— वराने दिलेली, पिवळ्या सुतांत गांडविलेली ही सोन्याची ताली ह्या वधूचा मुख्यालंकार होवो. “ ॐ एतस्याः ” इत्यादि मंत्रानें वराने वधूच्या कंठांत ताली बांधावी. हें तालीबंधन विवाह झाल्या दिवसापासून चवथ्या दिवशीं करावें.
आशीर्वाद मंत्र.
For Private And Personal Use Only