________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
त्रैवर्णिकाचार अथवा धर्मरसिकशास्त्र. पान २. Receneaveerencexcseenerceeeeeeeeeeeeera
रात्रंदिवस मेहनत करीत आहेत, कित्येक राज्य मिळविण्याच्या धांदलींत गुंतले आहेत, कित्येक निराळेच १दुर्व्यापार करण्यांत गुंतले आहेत, असे नेहमी आपल्या दृष्टी पडते. त्यावरून सुखाचे साधन एकच नसून
ती अनेक आहेत, सुखप्राप्तीकरितां असें ह्मणणे भाग पडते. परंतु आमच्या पूर्वाचार्यांनी आपल्या विशाल बुध्दीने विचार करून सर्व सुखाचे एकच साधन शोधून काढले आहे. वर सांगितलेली साधनें चिरस्थायी नसून स्वल्पकालांत नाश पावणारी आहेत, परंतु हे साधन चिरस्थायी असन अविनाशी आहे. वरील साधनांत अनेकांचे पारतंत्र्य असते, परंतु पूर्वाचार्यानी शोधून काढलेल्या साधनांत मनुष्य स्वतंत्र होऊन सुखानुभव करतो. वरील द्रव्यपुत्रादिक साधनें ही एखादेवेळी दुःखाला कारणीभूत होतात; परंतु ह्या, साधनापासून दुःखतर मुळीच होत नमून, उलट कोणत्याही कारणाने दुःख प्राप्त झाले असल्यास त्याचें? निवारणच होते. असे हे सर्व सुखसाधनापेक्षा अत्यंत महत्वाचे साधन आहे. आता इतक्या ह्या वर्णना-१ वरून हे साधन कोणते असावे' अशी जिज्ञासा वाचकांना होणे अगदी साहजिक आहे. त्याचे उत्तर ९. आचार्यानी फार थोड्या शब्दांत दिले आहे. ते ह्मणतात- भव्यहो! 'मुखं च न विना धर्मात् ' ह्मणजे, सुख हे धर्मावांचून होत नाही. तेव्हां धर्म हेंच सुखाचें मुख्य साधन आहे.
For Private And Personal Use Only