________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
तैवर्णिकाचार अथवा धर्मरसिकशास्त्र, पान ३.
आमच्या शास्त्रकारांनीं सुखाचे विनाशी आणि अविनाशी असे दोन भेद केले आहेत, आणि त्यांना ते क्रमानें अभ्युदय आणि निःश्रेयस अशी नांवें देतात. जीवाला संसारांत स्त्रीपुत्रादिकांपासून जें सुख होतें, व स्वर्गात जे सुख होतें त्याला अभ्युदय असें ह्मणतात, आणि जीव ह्या जन्ममरणात्मक संसारापासून मुक्त होऊन जें सुख भोगतो त्याला निःश्रेयस ह्मणतात. हीं दोनही प्रकारचीं सुखें धर्माच्या योगानें जीवाला प्राप्त होतात असा आपल्यांतील सर्वज्ञ तीर्थकर भगवंतानीं सिद्धांत बांधून ठेविला आहे. आणि ह्या सिद्धांतावर येणाऱ्या शंकांचा सर्वथा निरास करण्याकरितां आपल्यांतील प्राचीन पंडितांनी आपली कुशाग्रबुद्धि खर्च करून मोठमोठे ग्रंथ लिहून ठेऊन आमच्यावर अनंत उपकार ? केले आहेत. ते ग्रंथ समग्र वांचून पाहिले असतां धर्म हैं सुखसाधन आहे किंवा नाहीं ह्या शंकेचा सहज निरास होण्यासारखा आहे.
Resea
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
ह्या धर्माचे क्रियाकांड आणि ज्ञानकांड असे दोन भाग कल्पितां येण्यासारखे आहेत. त्यांतील क्रियाकांडांत आपण ज्यांना 'धार्मिकक्रिया, असें समजतो त्या क्रियांचा समावेश होतो. ह्या ?
For Private And Personal Use Only