________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
५४३ नास्ति वै जातितः शत्रुः पुरुषस्य विशांपते ।
येन साधारणी वृत्तिः स शत्रुर्नेतरो जनः ॥२।५५।१५ (दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणतो ) राजा, जन्मतःच कोणी मनुष्य दुसऱ्या मनुष्याचा शत्रु नसतो. आपल्या सारखीच ज्याची उपजीविका असेल तोच आपला शत्रु; दुसरा कोणी नाही. ५४४ नास्ति सत्यसमो धर्मो न सत्याद्विद्यते परम् ।
न हि तीव्रतरं किंचिदनृतादिह विद्यते ॥ ११७४।१०५ सत्यापरता धर्म नाही, सत्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही. असत्यापेक्षा अधिक भयंकर असें जगांत कांहींच नाही. ५४५ नास्थाने प्रक्रिया क्षमा ।। १२।११९।३
अस्थानी बहुमान करणे योग्य नव्हे. ५४६ नाहं राज्यं भवदत्तं भोक्तुमिच्छामि पार्थिव ।
बाहुवीयार्जितं राज्यमश्नीयामिति कामये ।। १२|७४।१८ [ मुचुकुंद कुबेराला म्हणतो ] तुझ्याकडून दान मिळालेले राज्य भोगण्याची माझी इच्छा नाही. स्वतःच्या बाहुबलाने मिळवून त्याचा उपभोग घ्यावा असें मी इच्छितो. ५४७ नाह्ना पूरयितुं शक्या न मासैभरतर्षभ ।
अपूयो पूरयनिच्छामायुषापि न शक्रयात्॥१२॥१७१४ वासनेची तृप्ति एका दिवसाने किंवा काही महिन्यांनीहि होणे शक्य नाही. वासना ही 'अपूर्य ' असून तिची पूर्ति करणे सबंध आयुष्य खर्चुन सुद्धां शक्य नाही. ५४८ निकृत्या निकृतिप्रज्ञा हन्तव्या इति निश्चयः।
न हि नैकृतिकं हत्वा निकृत्या पापमुच्यते ।। ३।५२।२२ कपटबुद्धि शत्रूचा कपटानेच वध केला पाहिजे असा सिद्धांत आहे. कपटी शत्रूचा कपटाने वध केला असता त्याला पाप म्हणत नाहीत.
For Private And Personal Use Only