________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
५३१ नारभेतान्यसामर्थ्यात्पुरुषः कार्यमात्मनः ।
मतिसाम्यं द्वयोनास्ति कार्येषु कुरुनन्दन ॥२॥५६।८ मनुष्याने दुसऱ्याच्या सामर्थ्यावर अवलंबून राहून आपले कार्य हाती घेऊ नये, कारण एकाच कार्याविषयी दोघांचे मत सारखे नसते. ५३२ नालं सुखाय सुहृदो नालं दुःखाय शत्रवः ।
न च प्रज्ञालमानांन सुखानामलं धनम् ॥१२॥१७४।२९ मित्र असले म्हणून ते सुख देऊ शकतात असे नाही, व शत्रु असले म्हणून ते दुःख देऊ शकतात असेंहि नाहीं, बुद्धीच्या योगाने द्रव्यप्राप्ति होतेच असे नाही, व द्रव्याच्या योगाने सुख होतेच असेंहि नाही. ५३३ नालसाः प्राप्नुवन्त्यर्थान्न क्लीवा नाभिमानिनः ।
नच लोकरवाद्भीतान वै शश्वत्प्रतीक्षिणः ॥१२॥१४०१२३ आळशी, दुर्बळ, गर्विष्ठ, लोकापवादाला भिणारे, आणि नेहमी वाट पहात राहणारे दीर्घसूत्री अशांना इष्टप्राप्ति होत नाही. ५३४ नावं न शक्यमारुह्य स्थले विपरिवर्तितुम् ।
तथैव रथमारुह्य नाप्सु चर्या विधीयते ॥ १४॥५०॥३० नावेत बसून जमिनीवर इकडे तिकडे हिंडतां येणे शक्य नाही. आणि रथांत बसून पाण्यावर चालता येणार नाही. ५३५ नाश्रोत्रियः श्रोत्रियस्य नारथी रथिनः सखा ।
नाराजा पार्थिवस्यापि सखिपूर्व किमिष्यते ॥१।१३।११ (द्रुपद राजा द्रोणाचार्यांना म्हणतो ) वेदवेत्त्या ब्राह्मणाचा मित्र वेद न जाणणारा नसतो. रथांतून लढणा-या योद्धयाचा मित्र त्याच्याचसारखा असतो. राजाचा मित्र राजाच असतो. पूर्वीच्या मैत्रीला काय करावयाचें ? ५३६ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥६२६१६ जें मूळांतच नाही ते अस्तित्वात येणे शक्य नाही, आणि जे आहे ते नाहीसे होणे शक्य नाही. असा दोहोंच्या खऱ्या स्वरूपाचा निर्णय तत्त्वदर्शी पुरुषांनी ठरविला आहे.
For Private And Personal Use Only