________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
४७८ न स क्षयो महाराज यः क्षयो वृद्धिमावहेत् । ।
क्षयः स त्विह मन्तव्यो यं लब्ध्वा बहु नाशयेत् ॥५।३९/७. ( विदुर धृतराष्ट्राला म्हणतो ) जो क्षय उत्कर्षाला कारण होतो तो खरोखर क्षय नव्हे. जो प्राप्त झाला असतां बहुत नाश करतो त्यालाच क्षय म्हणावें. ४७९ न सख्यमजरं लोके हृदि तिष्ठति कस्यचित् । __ कालो ह्येनं विहरति क्रोधो वैनं रहत्युत ॥१।१३१७
जगांत कोणाच्याहि अंतःकरणांत स्नेहभाव कमी न होतां एकसारखा टिकून रहात नाही. कालांतराने स्नेह नाहीसा होतो किंवा क्रोधामुळेहि नष्ट होतो. ४८० न सा सभा यत्र न सन्ति वृद्धा
न ते वृद्धा ये न वदन्ति धर्मम् । नासौ धर्मो यत्र न सत्यमस्ति
न तत्सत्यं यच्छलेनाभ्युपेतम् ॥ ५।३५।५८ जेथे वृद्ध लोक नाहींत ती सभा नव्हे. जे धर्माला अनुसरून भाषण करीत नाहीत. ते वृद्ध नव्हेत. ज्यांत सत्य नाहीं तो धर्म नव्हे. आणि जें कपटाने युक्त असेल तें सत्यहि नव्हे. ४८१ न हायनैर्न पलितैर्न वित्तैर्न च बन्धुभिः । __ऋषयश्चक्रिरे धर्म योऽनूचानःस नो महान् ॥ १२॥३२३१६
वयोमान, पिकलेले केस, धनदौलत आणि सोयरेधायरे यांचे बलावर कोणाला मोठेपणा प्राप्त होत नाही. ऋषींनी असा नियम ठरविला की, जो सांगवेदाचें अध्ययन करणारा त्यालाच आम्ही श्रेष्ठ समजतो. ४८२ न हि कल्याणकृत्कश्चिद्दगति तात गच्छति ॥ ६।३०४०
(श्रीकृष्ण सांगतात ) बा अर्जुना, शुभ कर्मे करणारा केव्हांहि दुःस्थितीप्रत जात नाही. ४८३ न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ।।६।२७५ काहीहि कर्म न करितां कोणीहि एक क्षणभर देखील राहू शकत नाही,
For Private And Personal Use Only