SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 86
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir ७६ सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि ४७१ न वै श्रुतमविज्ञाय वृद्धाननुपसेव्य वा । धर्मायौं वेदितुं शक्यौ बृहस्पतिसमैरपि || ५|३९|४१ शास्त्र समजून घेतल्यावांचून अथवा वृद्धांचा समागम केल्यावांचून धर्म व अर्थ या दोन पुरुषार्थाचें ज्ञान होणें बृहस्पतीसारख्या बुद्धिमान् पुरुषांनाहि शक्य नाहीं. ४७२ न वै सुखं प्राप्नुवन्तीह भिन्नाः || ५ | ३६ | ५६ आपसांत फुटून राहणारांना जगांत सुख खचित प्राप्त होत नाहीं. ४७३ न शत्रुर्वशमापन्नो मोक्तव्यो वध्यतां गतः || ५|३८|२९ ज्याचा अवश्य वध केला पाहिजे असा शत्रु हातांत सांपडला असतां सोडून देऊ नये. ४७४ न शत्रुर्विवृतः कार्यो वधमस्याभिकाङ्क्षता । क्रोधं भयं च हर्षे च नियम्य स्वयमात्मनि ॥१२११०३।८ शत्रूला ठार मारण्याची इच्छा करणाऱ्यानें आपला शत्रु प्रगट करूं नये, म्हणजे - त्याच्याशीं उघड द्वेष करूं नये. राग, भय व आनंद हीं आंतल्याआत दाबून ठेवावीं. ४७५ न श्रेयः सततं तेजो न नित्यं श्रेयसी क्षमा || ३ |२८|६ सदोदित तीव्रपणा श्रेयस्कर नाहीं, तसेंच नेहमीं सौम्यपणाहि कामाचा नाहीं. • ४७६ नष्टं समुद्रे पतितं नष्टं वाक्यमशृण्वति । अनात्मनि श्रुतं नष्टं नष्टं हुतमनग्निकम् ||५|३९|४२ जें समुद्रांत पडलें तें नष्ट झालें. न ऐकणाऱ्याला सांगितलेले वायां गेलें. स्वेच्छाचारी माणसाची विद्या फुकट गेली. राखेंत टाकलेली आहुति व्यर्थ गेली. ४७७ न संशयमनारुह्य नरो भद्राणि पश्यति । संशयं पुनरारुह्य यदि जीवति पश्यति ।। १२/१४०/३४ संकटांत सांपडल्यावांचून मनुष्याला चांगल्या गोष्टी प्राप्त होत नाहींत. पण संकटांत • सांपडल्यानंतर जर तो जिवंत राहिला तर त्याला आपलें कल्याण झालेलें दिसून येईल. For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy