________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
३०६ क्षेत्रं पुरुषकारस्तु दैवं बीजमुदाहृतम् ।
क्षेत्रबीजसमायोगात्ततः सस्यं समृध्यते ॥ १३॥६८ उद्योग हे शेत व दैव हे बी आहे ( उद्योगरूप ) शेत व [ दैवरूप ] बी यांचा संयोग झाला म्हणजे उत्तम प्रकारचे [ यशोरूपी ] पीक येते. ३०७ खरीवात्सल्यमाहुस्तनिःसामथ्येमहेतुकम् ॥ ५।१३५/८
में निष्कारण आणि निरुपयोगी वात्सल्य त्याला गाढवीचें प्रेम म्हणतात. ३०८ गतोदके सेतुबन्धो यादृक्ताङ्मतिस्तव ।
संदीप्ते भवने यद्वत्कूपस्य खननं तथा ॥ ६।४९।२३ (पांडवांशी युद्धाचा प्रसंग आणूं नको, म्हणून मी दुर्योधनाला परोपरीने सांगितले असें धृतराष्ट्राने म्हटले त्यावर संजयाने दिलेले हे उत्तर आहे.) पाणी वाहून गेल्यावर बंधारा बांधावा, किंवा घराला आग लावल्यावर विहीर खणूं लागावें त्यासारखा हा तुझा विचार आहे. ३०९ गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रसंग्रहैः।
या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिःसृता ॥ ६।४३३१ एकट्या गीतेचे चांगले अध्ययन करावें. इतर भाराभर शास्त्रांची गीतेपुढे काय मातब्बरी ? गीता ही प्रत्यक्ष पद्मनाभ जो परमात्मा श्रीकृष्ण त्याच्या मुखकमलांतून बाहेर पडलेली आहे. ३१० गुणयुक्तेऽपि नैकस्मिन्विश्वसेत विचक्षणः ॥१२॥२४॥१८
गुणसंपन्न अशाहि एकट्या मनुष्यावर शहाण्यानें विश्वास ठेवू नये. ३११ गुणानामेव वक्तारः सन्तः सत्सु नराधिप॥१२॥१३२।१३ __ (भीष्म युधिष्ठिराला म्हणतात ) सज्जन हे सज्जनांचे गुण तेवढेच सांगत असतात. ३१२ गुणान्गुणवतां शल्य गुणवान्वेत्ति नागुणः ।। ८१४०१२
(कर्ण म्हणतो.) हे शल्या, गुणवान् लोकांच्या गुणांची पारख स्वतः गुणी असलेल्यालाच होत असते; गुणहीन असलेल्याला होत नाही..
For Private And Personal Use Only