________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि
२९९ क्षमा गुणो ह्यशक्तानां शक्तानां भूषणं क्षमा || ५|३३|४९
क्षमा हा दुर्बळांचा गुण, व समर्थाचें भूषण होय.
३०० क्षमा प्रशस्यते लोके न तु पापोऽर्हति क्षमाम् || ७|१९८।२६
क्षमा करणे ही गोष्ट लोकांत चांगली समजली जाते. तरीपण पापी मनुष्य क्षमेला पात्र नाहीं.
३०१ क्षमावन्तं हि पापात्मा जितोऽयमिति मन्यते ।। ७।१९८।२७ क्षमा करणाऱ्याविषयीं दुष्ट मनुष्याला वाटतें कीं आपण याला जिंकलें. ३०२ क्षमावान्निरमर्षश्च नैव स्त्री न पुनः पुमान् ॥ ५।१३३।३३ जो अपमान सहन करतो, ज्याला राग येत नाहीं तो स्त्रीहि नव्हे, तर तो नव्हेच नव्हे !
आणि पुरुष
३०३ क्षात्रो धर्मो ह्यादिदेवात्प्रवृत्तः
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
पश्चादन्ये शेषभूताश्च धर्माः ॥ १२।६४।२१
३०४ क्षिप्रं विजानाति चिरं शृणोति
ब्रह्मदेवापासून क्षात्रधर्म हाच प्रथम उत्पन्न झाला, व नंतर दुसरे धर्म निर्माण झाले असून ते सर्व त्याचे अंगभूत आहेत.
विज्ञाय चार्थे भजते न कामात् । नासंपृष्टो व्युपयुके परार्थे
तत्प्रज्ञानं प्रथमं पण्डितस्य || ५|३३|२२
४९
सांगितलेलें चटकन् समजणे, दुसऱ्याचें म्हणणे पुरेसा वेळ ऐकून घेणें, इच्छेची पर्वा न करतां विचार करून कोणतीहि गोष्ट हातीं घेणें आणि कोणी विचारल्यावांचून दुसऱ्याच्या कामांत न पडणें, हें पंडिताचे मुख्य लक्षण होय.
३०५ क्षुधा निर्णदति प्रज्ञां धर्मबुद्धिं व्यपोहति ।
क्षुधापरिगतज्ञानो धृतिं त्यजति चैव ह । १४ ९० १९१ क्षुधा ही बुद्धिभ्रंश करते, धर्मबुद्धि नष्ट करते, आणि क्षुधेच्या योगानें मनुष्याचे ज्ञान पार नाहींसें होऊन त्याचें धैर्य गळून जातें.
म. भा. ४
For Private And Personal Use Only