SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 48
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir ३८ सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि २२६ कच्चित्कृतं विजानीषे कर्तारं च प्रशंससि । सतां मध्ये महाराज सत्करोषि च पूजयन् ॥ २/५ ।११९ ( नारदमुनि युधिष्ठिराला विचारितात ) राजा, तूं केलेला उपकार स्मरतोस ना ? आणि उपकारकर्त्यांची प्रशंसा करतोस ना ? त्याचप्रमाणे चांगल्या लोकांसमोर त्याचा गौरव करून सत्कार करतोस ना ? २२७ कच्चित्ते सर्वविद्यासु गुणतोऽर्चा प्रवर्तते ।। २/५/९६ [ राजा ], तूं सर्व विद्यांचा त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणें परामर्ष घेतोस ना ? २२८ कच्चित्सहस्रैर्मूर्खाणामेकं क्रीणासि पण्डितम् । पण्डितो ह्यर्थकृच्छ्रेषु कुर्यान्निःश्रेयसं परम् || २/५/३५ हजारों मूर्ख देऊन त्यांच्या बद्दल एक पंडित तूं विकत घेतोस का ? कारण अडीअडचणीच्या प्रसंगीं पंडिताचा फार उपयोग होईल. २२९ कच्चि प्रथम यामौ रात्रेः सुप्त्वा विशांपते । संचिन्तयसि धर्मार्थी याम उत्थाय पश्चिमे || २/५/८५ राजा, रात्रींच्या दुसऱ्या व तिसऱ्या ह्या दोन प्रहरांत झोप घेतोस ना ? शेवटच्या ( चौथ्या ) प्रहरीं उठून तूं धर्मार्थाचें चिंतन करतोस ना ? २३० कच्चिद्राष्ट्रे तडागानि पूर्णानि च बृहन्ति च भागशो विनिविष्टानि न कृषिर्देवमातृका || २/५/७७ तुझ्या राज्यांत पाण्याने तुडुंब भरलेले मोठाले तलाव जागोजाग खोदलेले आहेत ना ? शेती केवळ पावसावर अवलंबून नाहीं ना ? २३१ कच्चिद्विद्याविनीतांश्च नराञ्ज्ञानविशारदान् । यथा गुणतश्चैव दानेनाभ्युपपद्यसे || २/५/५३ विद्याविनयसंपन्न व कलाकुशल गुणी जनांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणें व गुणाप्रमाणे पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करतोस ना ? For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy