________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
७६ भूर्यप्यभक्तोपहृतं न मे तोषाय कल्पते ॥११॥२७॥१८ (श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात.) ज्याच्या अंतःकरणांत भक्ति नाही त्याने पुष्कळ उपचार अर्पण केले तरी त्यापासून मला संतोष होत नाही. ७७ भौमान् रेणून स विममे यो विष्णोर्वर्णयेद्गुणान् ८५।६
श्रीविष्णूचे संपूर्ण गुण जो वर्णन करील, तो भूमीच्या रजःकणांचीही गणना करील. ७८ भ्रातरीशकृतः पाशो नृणां यः स्नेहसंज्ञितः ।
तंदुस्त्यजमहं मन्ये शूराणामपि योगिनाम् १०१८४६१ (वसुदेव नंदाला म्हणाला.) हे दादा, स्नेह नांवाचा जो मनुष्यांना पाशच आहे, तो ईश्वराने निर्माण केलेला असल्यामुळे शूर लोकांना व योगिजनांना देखील तोडण्यास मोठा कठीण आहे असें मी समजतो. ७९ मल्लानामशनिर्गुणां नरवरः स्त्रीणां स्मरो मूर्तिमान्
गोपानां स्वजनोऽसतां क्षितिभुजां शास्ता स्वपित्रोः शिशुः। मृत्युर्भोजपतेर्विराडविदुषां तत्त्वं परं योगिनां वृष्णीनां परदेवतेति विदितो रङ्गं गतः साग्रजः ॥
१०॥४३॥१७ ( कंसाच्या रंगमंडपांत असलेल्या सर्व लोकांना त्यांच्या त्यांच्या अभिप्रायाप्रमाणे श्रीकृष्ण भासला. ) चाणूरमुष्टिकादिक मल्लांना वज्र, सामान्य मनुष्यांना श्रेष्ठ पुरुष, स्त्रियांना मूर्तिमंत मदन, नंदादिक गोपांना स्वजन, दुष्ट राजांना शासन करणारा, वसुदेव देवकी यांना बालक, कंसाला मृत्यु, अज्ञ लोकांना मोठाच पराक्रम करणारा, योग्यांना परमात्मतत्त्व आणि यादवांना परमदेवता. याप्रमाणे श्रीकृष्ण बलरामासह रंगमंडपांत शिरला असतां, ज्यांच्या त्याच्या भावनेप्रमाणे एकच असून अनेकप्रकारचा भासला.
For Private And Personal Use Only