________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
२३
७२ ब्राह्मणः समदृक् शान्तो दीनानां समुपेक्षकः ।
स्रवते ब्रह्म तस्यापि भिन्नभाण्डात्पयो यथा ॥४।१४।४१ सर्व ठिकाणी समदृष्टि ठेवणारा व शांत असा ब्राह्मणही जर दीन जनांची उपेक्षा करील, तर त्याचेही तप ज्याप्रमाणे फुटक्या भांड्यांतून पाणी हळूहळू पाझरून जाते, त्याप्रमाणे उत्तरोत्तर क्षीण होत जाऊन शेवटीं नाहींसें होतें. ७३ ब्रूयुः स्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यमप्युत ॥१११११८ गुरु प्रेमळ शिष्याला रहस्यही सांगतात. ७४ भयं प्रमत्तस्य वनेष्वपि स्यात्
यतः स आस्ते सहषट्सपत्नः। जितेन्द्रियस्यात्मरतेव॒धस्य
गृहाश्रमः किं नु करोत्यवद्यम् ॥५।१।१७ · आसक्ति उत्पन्न होईल या भीतीने इंद्रिये स्वाधीन नसलेला मनुष्य या वनांतून त्या वनांत जरी फिरत राहिला, तथापि तेथे त्याला संसारभय प्राप्त होतेच. कारण त्याच्याबरोबर कामक्रोधादि सहा शत्रु असतातच. बरें, इंद्रिये जिंकून आत्मस्वरूपी रममाण असणारा ज्ञाता पुरुष गृहस्थाश्रमांत राहिला, तरी त्याचे काय नुकसान होणार आहे ? कांहीं नाहीं. ७५ भूतानामिह संवासः प्रपायामिव सुव्रते ॥ ७।२।२१ ( हिरण्यकशिपु आपल्या मातेला म्हणतो. ) हे सुव्रते माते, पाणपोईवर जमलेल्या लोकांचा सहवास जसा क्षणिक असतो, त्याप्रमाणे या लोकामध्ये प्राण्यांचा समागम क्षणिक आहे.
For Private And Personal Use Only