________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
४११ वातान्तर्दीपकशिखालोलं जगति जीवितम् ।
तडित्स्फुरणसंकाशा पदार्थश्रीर्जगत्रये ॥ १।२८।११ वान्याच्या झोतांत सांपडलेल्या दिवटीच्या ज्योतीप्रमाणे जगांतील जीविताची स्थिति क्षणभंगुर आहे. त्रैलोक्यांतील सर्व पदार्थाची शोभा विजेच्या प्रकाशाप्रमाणे चंचल आहे. ४१२ वासनातन्तुबद्धा ये आशापाशवशीकृताः।
वश्यतां यान्ति ते लोके रज्जुबद्धाः खगा इव ॥४।२७।१८ जे आशापाशांत गुरफटले जाऊन वासनातंतूंनी बद्ध झालेले असतात, ते जाळ्यांत अडकलेल्या पक्ष्यांप्रमाणे कोणालाही सहज जिंकतां येतात. ४१३ वासनातानवं राम मोक्ष इत्युच्यते बुधैः ।
पदार्थवासनादाढ्य बन्ध इत्यभिधीयते ॥ २।२।५ (श्रीवसिष्ठ म्हणतात) हे रामा, वासना क्षीण होत जाणे या स्थितीलाच ज्ञाते पुरुष मोक्ष असें म्हणतात. व पदार्थाबद्दलची वासना दृढ होत जाणे हाच बंध होय असे त्यांचे मत आहे. ४१४ वासनावागुराकृष्टो मनोहरिणको नृणाम् ।
परां विवशतामेति संसारवनगुल्मके ॥ ३॥११०।११ . वासनारूपी जाळ्यांत सांपडलेलें मनुष्याचें मनोरूपी हरिण संसाररूपी वनांतील झाडींत अतिशय विव्हल होऊन जाते. ४१५ विचारसंतोषशमसत्समागमशालिनि ।।
प्रवर्तन्ते श्रियो जन्तौ कल्पवृक्षाश्रिते यथा॥२।१६।२४ कल्पवृक्षाचा आश्रय केला म्हणजे सर्व त-हेचें ऐश्वर्य प्राप्त होते याप्रमाणे विचार, संतोष, शम आणि सत्समागम यांनी युक्त असलेल्या मनुष्याला सर्व ऐश्वर्य प्राप्त होते.
For Private And Personal Use Only