________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि ७९ wwwmmmmmmmmmmwwwwwwwwwa...www.unimawwwwwwwwwwwww ४०६ वरं कर्दमभेकत्वं मलकीटकता वरम् । ___ वरमन्धगुहाहित्वं न नरस्याविचारिता ॥२॥१४॥४६ चिखलांत बेडूक होऊन राहावे लागणे, घाणीमधील किडा बनावें लागणे किंवा एखाद्या गुहेमध्ये आंधळा सर्प होऊन रहावें लागणे चांगले, परंतु मनुष्य होऊनही विचाररहित असणे चांगले नाही. ४०७ वसनाशनमात्रेण तुष्टाः शास्त्रफलानि ये।
जानन्ति ज्ञानबन्धूंस्तान्विद्याच्छास्त्रार्थशिल्पिनः७।२११५ उत्तमवस्त्रे आणि भोजनादि पदार्थ मिळणे हेच शास्त्रज्ञानाचे फल असे समजून आनंद मानणारे लोक शास्त्रार्थाचे केवळ शिल्पी (कसबी) होत. ज्ञानी नव्हत. ( कारागीर लोकांनी तयार केलेल्या सुंदर वस्तूंचे भोक्ते दुसरे, कारागीर फक्त मजुरीचे मालक. तीच यांची त-हा.) ४०८ वसन्तो नन्दनोद्यानमिन्दुरप्सरसः स्मृताः।
इत्येकतः समुदितं संतोषामृतमेकतः ॥ ७४७४४४ वसंत ऋतु, नंदनवन, चंद्र, आणि अप्सरा या सर्वांपासून होणारें सुख एका संतोषरूपी अमृतापासून मिळतें. ४०९ वस्त्वल्पमप्यतिबृहल्लघुसत्त्वो हि मन्यते ॥ ७।१८।२३ ___ कोणताही प्राणी आपल्या बुद्धिसामर्थ्याप्रमाणे वस्तूला महत्त्व देतो. कमी बुद्धीचा मनुष्य अतिशय मूल्यवान पदार्थाला कमी किंमतीचा समजून क्षुद्रवस्तूला फार महत्त्व देतो. (उंदीर रत्नादिकांना तुच्छ मानून धान्याचे कण गोळा करतात. तसेंच खेळणारे मूल मातीचें नवीन चित्र घेण्यासाठी जवळचा मूल्यवान दागिना देण्यासही तयार होते.) ४१० वस्त्वस्थानगतं सर्व शुभमप्यशुभं भवेत् ॥७११६।५२ कोणतीही शुभवस्तु अयोग्य ठिकाणी राहिल्यास ती अशुभ होते.
For Private And Personal Use Only