________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३९४ योऽन्तःशीतलता यातो यो भावेषु न मज्जति ।
व्यवहारी न संमूढः स शान्त इति कथ्यते॥२।१३।७८ ज्याचे अंतःकरण तृप्त आहे, विषयांच्या पसान्यांत राहूनही जो विषयासक्त होत नाही, आणि व्यवहार करीत असूनही जो मोह. पावत नाही, तोच खरा शांत होय. ३९५ यो यादृक्क्लेशमाधातुं समर्थस्ताहगेव सः ।
अवश्यं फलमानोति प्रबुद्धोऽस्त्वज्ञ एव वा॥७१०२।३३. ज्ञानी असो अज्ञानी असो, जो ज्या प्रकारचे कष्ट करण्यास समर्थ असेल, त्याप्रकारचे फल त्याला अवश्य प्राप्त होते. ३९६ यो यो यथा प्रयतते स स तत्तत्फलैकभाक् ।
न तु तूष्णीं स्थितेनेह केनचित्प्राप्यते फलम् ॥२।७।१९ जो जो मनुष्य जसा जसा प्रयत्न करतो, तसे तसें फल त्याला प्राप्त होते; परंतु स्वस्थ बसून कोणालाही फल प्राप्त होत नाही. ३९७ यो यो यादृग्गुणो जन्तुः स तामेवैति संस्थितिम् ।
सदृशेष्वप्यजेषु श्वा न मध्ये रमते क्वचित् ॥५॥३२।२९ जो ज्या गुणाचा असेल तो त्या गुणाला योग्य अशा स्थितीतच राहातो. रंगारूपाने एखादा कुत्रा बकन्यासारखा असला तरी तो त्यांच्या कळपांत केव्हांही रमत नाही. ३९८ योऽस्मत्तातस्य कूपोऽयमिति कौपं पिबत्यपः। त्यक्त्वा गाङ्गं पुरःस्थं तं को न शास्त्यतिरागिणम् ॥२।१८।४ 'ही विहीर आमच्या वडिलांनी खणलेली आहे ' असें म्हणून आपल्या पुढे असलेले गंगेचे पाणी टाकून जो त्या विहिरीचेच पाणी पितो, त्या हट्टी मनुष्याला कोण बरें सांगणार ? ३९९ रम्यवस्तुक्षयायैव मूढानां जृम्भते पदम् ॥ ६।१२।२५ सुंदर वस्तूंचा नाश करण्यासाठीचमूढलोकांचे स्थान वाढत असते
For Private And Personal Use Only