________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३८९ येनाभ्यासः परित्यक्त इष्टे वस्तुनि सोऽधमः ।
कदाचिन्न तदामोति वन्ध्या स्वतनयं यथा॥७६७१३४ ज्याने इच्छिलेल्या वस्तूविषयींचा अभ्यास सोडून दिला, तो नीच होय. वंध्येला ज्याप्रमाणे स्वतःचा मुलगा प्राप्त होत नाही, त्याप्रमाणे अभ्यास सोडून देणाराला इष्ट वस्तु कधीही प्राप्त होत नाही. ३९० ये शूरा ये च विक्रान्ता ये प्राज्ञा ये च पण्डिताः ।
तैस्तैः किमिव लोकेऽस्मिन्वद दैवं प्रतीक्ष्यते ॥२।८।१७ (श्रीवसिष्ठ म्हणतात हे रामा,) या जगांत जे लोक शूर, पराक्रमी, बुद्धिमान व पंडित म्हणून प्रसिद्धीला आले ते केवळ पौरुषाच्याच योगाने होत. तूंच सांग की, ते कधी देवाची वाट पहात बसले होते काय? ३९१ येषां गुणेष्वसंतोषो रागो येषां श्रुतं प्रति ।
सत्यव्यसनिनो ये च ते नराः पशवोऽपरे ॥४॥३२॥४३ ज्यांचा हावरेपणा सद्गुणांविषयी आहे, ज्यांना प्रेम विद्येचे आहे, आणि व्यसन सत्याचे आहे, तेच खरोखर मनुष्य होत. इतर लोक केवळ पशुतुल्य होत. ३९२ यैरेव जायते रागो मूर्खस्याधिकतागतैः ।
तैरेव भोगैः प्राज्ञस्य विराग उपजायते ॥४।४६५ ज्या विषयोपभोगांच्या समृद्धीमुळे मूर्ख मनुष्यांना प्रेम उत्पन्न होते, त्याच विषयांच्या अभिवृद्धीमुळे ज्ञात्यांना वैराग्य उत्पन्न होतें. ३९३ यो न निर्वासनो नूनं सर्वधर्मपरोऽपि सः।
सर्वज्ञोऽप्यभितो बद्धः पञ्जरस्थो यथा खगः॥६॥५५।४४ ज्याच्या वासना नाहीशा झाल्या नाहीत, तो खरोखर सर्वधर्मपरायण व सर्वज्ञ जरी असला तरी पिंजन्यांतील पक्ष्याप्रमाणे सर्व बाजूंनी बद्धच आहे.
For Private And Personal Use Only