________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
७२
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३६६ यन्नाम किल नास्त्येव
। तच्छान्तौ का कदर्थना ॥ ७१४२।४५ मुळांत जी वस्तु नाही,तिचा परिहार करण्याविषयी क्लेश तरी कसले! ३६७ यन्मयो हि भवत्यङ्ग पुरुषो वक्ति तादृशम् ॥७।२९।४०
(श्रीवसिष्ठ रामाला सांगतात.) मनुष्याचे जसें ज्ञान असेल, तसें तो भाषण करतो. ३६८ यमो निणराजेन्द्रो नातं नामानुकम्पते ।
सर्वभूतदयोदारो जनो दुर्लभतां गतः ॥ १।२६।७ यम हा अत्यंत निर्दय असून त्याला दुःखितांची मुळींच कींव येत नाही. सर्व प्राण्यांवर दया करणारा थोर मनुष्य या जगांत फारच विरळा. ३६९ ययैवाजीव्यते युक्त्या सैवापदि विराजते ॥७१९६।१६
आपत्काली ज्या युक्तीने प्राण वाचतात, तीच उत्तम होय. ३७० यस्त्विच्छातानवे यत्नं न करोति नराधमः ।
सोऽन्धकूपे स्वमात्मानं दिनानुदिनमुज्झति ॥७३६।३१ जो नीच मनुष्य आपल्या इच्छा कमी करण्याचा प्रयत्न करीत नाहीं तो आपणाला प्रत्येक दिवशी अंधकूपांत फेकीत असतो. ३७१ यस्याग्रे न गलति संशयः समूलो
नैवासौ कचिदपि पण्डितोक्तिमेति ॥ ३७९।३३ जो आपल्यापुढे मांडलेल्या शंकेचे समूल निरसन करीत नाही, त्याला पंडित ही पदवी केव्हांच प्राप्त होत नाही. ३७२ यस्यान्तर्वासनारज्ज्वा ग्रन्थिवन्धः शरीरिणः ।
महानपि बहुज्ञोऽपि स बालेनापि जीयते ॥४।२७।२० जो मनुष्य अंतःकरणांतील वासनारूपी दोरीने घट्ट बांधलेला असतो, तो कितीही बलवान् किंवा विद्वान् असो, प्रसंगी लहानशा पोराकडूनही पराजित होतो.
For Private And Personal Use Only