________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्री योगवासिष्ठ सुभाषितानि
३५९ यदवयवधात्पापं वध्यत्यागात्तदेव हि || ३ |९०/३ अवध्याचा वध केल्यानें जितकें पातक लागतें, तितकेंच पातक वध्याचा वध न केल्यानें लागत असतें. ३६० यदार्यगर्हितं यद्वा न्यायेन न समार्जितम् ।
तस्माद् ग्रासाद्वरं मन्ये मरणं देहिनामिदम् || ३ |७६।७ आर्य लोकांनी निंद्य ठरविलेले किंवा अन्यायाचें कृत्य करून आपले पोट भरण्यापेक्षां मनुष्यांनीं मरून जाणें हेंच श्रेयस्कर होय. ३६१ यदिहास्ति तदन्यत्र यन्नेहास्ति न तत्क्वचित् ।
७१.
इमं समस्तविज्ञानशास्त्रकोशं विदुर्बुधाः || ३|८|१२
जें या योगवासिष्ठ ग्रंथांत आहे, तेच इतर ग्रंथांतून आहे आणि जें यांत नाहीं तें कोठेही नाहीं. कारण हा ग्रंथ म्हणजे सर्व विज्ञानशास्त्रांचें भांडार आहे, असें विद्वान् लोक मानतात. ३६२ यदेव क्रियते नित्यं रतिस्तत्रैव जायते || ३ |२| ४८
मनुष्य जें कृत्य नेहमीं करतो, तेंच पुन्हा करण्याची आवड त्याच्या ठिकाणी उत्पन्न होते.
३६३ यद्यथा कल्पितं येन स संपश्यति तत्तथा ।। ७।१७७।३
ज्यानें ज्या वस्तूची ज्या प्रकाराने कल्पना केली, तो त्या वस्तूला तशा प्रकारानें पाहतो. ३६४ यद्वस्तु विद्यमानं सत् प्रश्नस्तत्र विराजते ।। ६।९६।४२ जी वस्तु विद्यमान व सद्रूप असते, तिच्याविषयीं प्रश्न केला तर तो शोभतो.
३६५ यन्त्रं तिलानां कठिनं राशिमुग्रमिवाकुलम् ।
यं पीडयति नानङ्गस्तं मृत्युर्न जिघांसति || ६ | २३।१० तेल काढण्याचा कठीण घाणा तिळांची मोठी रास पिळून काढतो, त्याप्रमाणें मदन ज्याला व्याकुळ करून पीडा देत नाहीं, त्याला ठार मारण्याची इच्छा मृत्यु करीत नाहीं.
For Private And Personal Use Only