________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३०१ प्रत्यक्षमानमुत्सृज्य योऽनुमानमुपेत्यसौ।
स्वभुजाभ्यामिमौ साविति प्रेक्ष्य पलायते ॥२।५।१९ प्रत्यक्ष ज्याचें फळ दिसत आहे अशा पौरुषप्रयत्नाचा त्याग करून, केवळ अनुमानाने सिद्ध होणाऱ्या दैवाचा आश्रय जो मनुष्य करतो, तो आपल्याच हातांना सर्प मानून पळू लागतो, असे म्हणण्यास काय हरकत आहे ? ३०२ प्रभुताबृहितं चेतो नाहार्यमभिनन्दति ॥५।४६६
ज्याच्या ठिकाणी प्रभुत्व आले आहे, व अधिकार चालविण्याचे ‘सामर्थ्य आहे, त्याला कृत्रिम भूषणादिकांचे काय महत्त्व आहे. ३०३ प्रवाहपतितं कार्य कुर्वन्नपि न लिप्यते ॥ ४॥५६३४
प्रवाहपतित कार्य करणारा दोषांपासून अलिप्त असतो. ३०४ प्राक्तनं चैहिकं चेति द्विविधं विद्धि पौरुषम् ।
प्राक्तनोऽद्यतनेनाशु पुरुषार्थेन जीयते ॥२।४।१७ पूर्वीचें व हल्लींचे असे दोन प्रकारचे पौरुष आहे. या जन्मांत मनुष्याने नेटाने प्रयत्न केला असतां पूर्वजन्मांतील पौरुष नाहीसे करून टाकितां येते. ३०५ प्राक्स्वकर्मेतराकारं देवं नाम न विद्यते ।
बालः प्रबलपुंसेव तजेतुमिह शक्यते ॥ २।६।४ आपणच पूर्वी केलेल्या कर्माशिवाय दैव म्हणून काही निराळी वस्तु नाहीं; इतकेच नव्हे तर शक्तिमान् मनुष्य एखाद्या लहान मुलाला आपल्या कह्यांत ठेवतो, त्याप्रमाणे पूर्वीच्या दुष्टसंस्कारांना सध्या केलेल्या प्रयत्नांनी जिंकून टाकतां येणे अगदीं शक्य आहे. ३०६ प्राशं प्राप्य न पृच्छन्ति ये केचित्ते नराधमाः ३७८१३३
विद्वानाची गांठ पडली असतां प्रश्न विचारून जे आपला संशय नाहींसा करून घेत नाहीत, ते केवळ नराधम होत.
For Private And Personal Use Only