________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीयोगवासिष्ठ सुभाषितानि
२९६ पौरुषेण प्रयत्नेन त्रैलोक्यैश्वर्यसुन्दराम् । कश्चित्प्राणिविशेषो हि शक्रतां समुपागतः || २|४|१३ पौरुषप्रयत्नाचा अवलंब करून कोणा एका मनुष्यानें त्रैलोक्याच्या ऐश्वर्यानें युक्त असलेलें श्रेष्ठ इंद्रपद प्राप्त करून घेतलें. २९७ पौरुषेणान्नमाक्रम्य यथा दन्तेन चूर्ण्यते ।
अन्यः पौरुषमाश्रित्य तथा शूरेण चूर्ण्यते ।। २६ । १२
१९
प्रयत्नानें अन्न मिळवून तोंडांत घातल्यानंतर त्याचें चर्वण दांतांनी केलें जातें, त्याप्रमाणें पौरुषाचाच आश्रय करून शूर मनुष्य दुबळ्या लोकांचें मर्दन करतो.
२९८ प्रज्ञया नखरालून मत्तवारणयूथपाः ।
जम्बुकैर्विजिताः सिंहाः सिंहरिणका इव || ५|१२|३१
आपल्या भयंकर पंजांनी मस्त हत्तीच्या कळपांतील मुख्य हत्तींना फाडून टाकणाऱ्या बलाढ्य सिंहांनाही कोल्ह्यांनी, आपल्या बुद्धीच्या बळावर सिंहांनी हरणांना सहज जिंकावें, त्याप्रमाणें अनेक वेळां जिंकले आहे.
२९९ प्रज्ञावानसहायोऽपि कार्यान्तमधिगच्छति । कार्यमासाद्य प्रधानमपि नश्यति ।। ५।१२।२३
दुष्प्रज्ञः
बुद्धिमान मनुष्याला कोणत्याही प्रकारची मदत नसली तरी तो मोठमोठी कार्ये करतो. पण बुद्धि नसलेल्या मनुष्याला केवढेही मोठें साहाय्य असलें तरी त्याच्या मुख्य कार्याचाच नाश होतो. ३०० प्रज्ञासौजन्ययुक्तेन शास्त्रसंवलितेन च ।
पौरुषेण न यत्प्राप्तं न तत्क्वचन लभ्यते || ६ | २९/९ शास्त्रीय मार्गानें विचार करणारी बुद्धि, सौजन्य व पौरुषप्रयत्न यांच्या योगानें प्राप्त होत नाहीं, अशी कुठेही वस्तू नाहीं.
For Private And Personal Use Only