________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
४८
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२३७ न मोक्षो नभसः पृष्ठे न पाताले न भूतले ।
मोक्षो हि चेतो विमलं सम्यग्ज्ञानविबोधितम् ५/७३ | ३५
मोक्ष हा कांहीं कोठें आकाशांत, पाताळांत किंवा पृथ्वीवर आहे असें नाहीं, तर योग्य तऱ्हेचें ज्ञान होऊन झालेली मनाची निर्मल स्थिति म्हणजेच मोक्ष होय.
२३८ न मौर्य्यादधिको लोके कश्चिदस्तीह दुःखदः || ५|२९|५७
या लोकांत मूर्खपणापेक्षां अधिक दुःखदायक असें कांहीं नाहीं. २३९ न वैराग्यात्परो बन्धुर्न संसारात्परो रिपुः ।। ६।१२७/५९ वैराग्याहून श्रेष्ठ दुसरा बंधु नाहीं व संसाराहून दुसरा शत्रु नाहीं. २४० न व्याधिर्न विषं नात्तथा नाधिश्व भूतले ।
खेदाय स्वशरीरस्थं मौर्ण्यमेकं यथा नृणाम् ||२| १३|१३
स्वतःच्या मूर्खपणामुळे जितकें दुःख भोगावें लागतें, तितकें दुःख मानसिक चिंता, शारीरिक पीडा, विष व आपत्ति यांच्यापासूनही भोगावें लागत नाहीं.
२४१ न शास्त्रैर्नापि गुरुणा दृश्यते परमेश्वरः ।
दृश्यते स्वात्मनैवात्मा स्वया सच्वस्थया धिया ६ । ११८|४ परमेश्वर शास्त्रे व गुरु यांच्या योगानें दिसत नाहीं. तर आपल्या स्वतःच्या सत्त्वस्थ बुद्धीनेंच त्याचें दर्शन होतें.
२४२ नष्टं नष्टमुपेक्षेत प्राप्तं प्राप्तमुपाहरेत् ।
निर्विकारतयैतद्धि परमार्चनमात्मनः || ६ |३९|४४
जें जें नष्ट झालें असेल त्याची उपेक्षा करणें आणि जें जें यहच्छेनें प्राप्त होईल त्याचा स्वीकार करण या दोन्ही गोष्टी निर्विकार चित्तानें कराव्या, म्हणजे हेंच आत्म्याचें श्रेष्ठ पूजन होईल.
For Private And Personal Use Only