________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१४२ आकिंचन्ये न मोक्षोऽस्ति किंचन्ये नास्ति बन्धनम् ।
किंचन्ये चेतरे चैव जन्तुज्ञानेन मुच्यते ॥१२॥३२०५० दारियांत मोक्ष नाही किंवा श्रीमंतीत बंधन नाही. श्रीमंतींत काय आणि गरिबीत काय, मनुष्य ज्ञानाने मुक्त होत असतो. १४३ आगमानां हि सर्वेषामाचारः श्रेष्ठ उच्यते ।
__आचारप्रभवो धर्मो धर्मादायुर्विवर्धते ॥ १३॥१०४।१५६
सर्व शास्त्रांत आचार हाच श्रेष्ठ म्हटला आहे. आचारापासून धर्माची उत्पत्ति होते. धर्माचरणाने आयुष्य वाढते. १४४ आत्मदोषैनियच्छन्ति सर्वे दुःखसुखे जनाः ॥११७८१३०
सर्व लोकांना स्वतःच्या कर्मामुळेच मुख किंवा दुःख प्राप्त होत असते. १४५ आत्मा जेयः सदा राज्ञा ततो जेयाश्च शत्रवः । __अजितात्मा नरपतिर्विजयेत कथं रिपून् ॥१२॥६९।४
राजाने नेहमी प्रथम आपले मन जिंकावें. म्हणजे मग त्याला शत्रूवर जय मिळविता येईल. ज्याने स्वतःचे मन जिंकलें नाहीं तो राजा शत्रूना कसा जिंकणार ? १४६ आत्मानं कः समुद्भध्य कण्ठे बद्धा महाशिलाम् ।
समुद्रं तरते दोभ्यां तत्र किं नाम पौरुषम् ॥४।४९।१६ स्वतःस जखडून घेऊन आणि गळ्यांत मोठी धोंड बांधून नुसत्या बाहूच्या जोरावर समुद्र तरून जाण्याच्या भरीस कोण पडेल ? असलें साहस करण्यांत पुरुषार्थ कसला ? १४७ आत्मानमसमाधाय समाधिसति यः परान् । -विषयेष्विन्द्रियवशं मानवाः प्रहसन्ति तम् ॥१२॥२६७।२७
आपले मन स्वाधीन न ठेवतां जो दुसऱ्यांना आपल्या ताब्यात ठेवू पहातो, अशा विषयासक्त इंद्रियाधीन पुरुषाचा लोक उपहास करतात. १४८ आत्मा पुत्रः सखा भायों
कृच्छ्रे तु दुहिता किल ॥ १११५९।११ पुत्र म्हणजे आपला आत्माच होय. भार्या हा मित्र होय. परंतु मुलगी म्हणजे मात्र खरोखर संकट होय!
For Private And Personal Use Only