________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२७
१२६ केनापदि विचार्यन्ते वर्णधर्मकुलक्रमाः॥ ३३१०६।५२
आपत्तीमध्ये सांपडलेला मनुष्य आपला वर्ण, धर्म, किंवा आपली कुलपरंपरा ह्यांचा विचार कधी तरी करतो का ? १२७ केवलात्कर्मणो ज्ञानान हि मोक्षोऽभिजायते ।
किं तूभाभ्यां भवेन्मोक्षः साधनं तूभयं विदुः ॥ १।११८ केवल कर्माने किंवा केवल ज्ञानानें मोक्ष साध्य होत नाही. तर कर्म आणि ज्ञान ही दोन्ही मोक्षाची साधने आहेत.' १२८ कोकिलः काकसंघातैः समवर्णाननाकृतिः।
गदितैर्व्यक्ततामेति सभायामिव पण्डितः ॥७११६।७३ कावळ्यांच्या समूहांत असलेला कोकिल पक्षी हा वर्ण, मुख व आकृति यांच्यामध्ये साम्य असल्यामुळे जरी ओळखू आला नाही, तरी ज्याप्रमाणे पंडित कोण आहे हे सभेतील भाषणावरून समजते,. त्याप्रमाणे मधुर शब्दांवरून कोकिल पक्षी सहज ओळखू येतो. १२९ को न गृह्णाति मूढोऽपि
वाक्यं युक्तिसमन्वितम् ॥७१८३२२ ज्या भाषणांत कांहीतरी युक्ति आहे, असे भाषण मूर्ख मनुष्य देखील मानीत असतो. १३० को नाम परिपृच्छन्तं विनीतं वश्चयेत्पुमान् ॥६।८५/८४
नम्रतेने प्रश्न करणाराला कोणता बरें पुरुष फसवील ? १३१ कोपं विषादकलनां विततं च हर्ष
नाल्पेन कारणवशेन वहन्ति सन्तः ॥१।५।१५ सत्पुरुषांना अल्पकारणावरून क्रोध, खेद किंवा हर्ष कधीही. उत्पन्न होत नाही.
For Private And Personal Use Only