________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
१२२ किं दूरं व्यवसायिनाम् ॥ ३॥२९॥३८
उद्योग करणाऱ्या लोकांना मिळविण्यास कठीण असें या जगांत काय आहे ? १२३ कुटिला कोमलस्पर्शा विषवैषम्यशंसिनी ।
दशत्यपि मनाक्स्पृष्टा तृष्णा कृष्णेव भोगिनी १११७।१७ विषयतृष्णा ही कुटिल असून तिचा स्पर्श आरंभी मोठा गोड वाटतो, परंतु परिणामी ती विषाप्रमाणे घात करिते. एकाद्या काळ्या नागिणीला जरा स्पर्श होतांच ती डसते त्याप्रमाणे तृष्णेला स्पर्श केल्याबरोबर ती मनुष्याला मूट बनविते. १२४ कुरङ्गालिपतङ्गेभमीनास्त्वेकैकशो हताः।
सर्वैयुक्तैरनफस्तु व्याप्तस्याज्ञ कुतः सुखम् ॥५।५२।२१ (उद्दालक मुनि अज्ञचित्ताला बोध करितात) शब्दस्पर्शादि विषय इतके अनर्थकारक आहेत की, एकेका विषयामध्ये आसक्त होणारे हरिण, भ्रमर, पतंग, हत्ती आणि मासा हे जीव घात करून घेतात. पांचही विषयांमध्ये रममाण होणान्या मनुष्यावर सर्व त-हेचे अनर्थ कोसळतील यांत नवल काय ? त्याला कोठून सुख मिळणार? १२५ कृच्छ्रेषु दूरास्तविषादमोहाः
स्वास्थ्येषु नोसिक्तमनोभिरामाः। सुदुर्लभाः संप्रति सुन्दरीभि
रनाहतान्तःकरणा महान्तः ॥ १।२७८ विपत्तीमध्ये ज्यांना विषाद वाटत नाही व मोह पडत नाहीं आणि संपत्ति प्राप्त झाली असतां जे गर्वाने फुगून जात नाहीत;. तसेंच सुंदर स्त्रिया पाहून ज्यांच्या अंतःकरणांत मुळींच विकार उत्पन्न होत नाही असे महात्मे सांप्रतकाळी फारच दुर्मिळ आहेत.
For Private And Personal Use Only