________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४९७ स्थिरं हि नूनं हृदयं ममायसं
न भिद्यते यद्धवि नो विदीर्यते । अनेन दुःखेन च देहमर्पित
ध्रुवं ह्यकाले मरणं न विद्यते ॥ २।२०५१ (राम वनवासाला जाणार हे ऐकून शोकाकुल झालेली कौसल्या म्हणते.) खरोखर माझें हृदय ज्याअर्थी ह्या प्रसंगी फाटून जात नाही, त्याअर्थी तें लोखंडाचे बनविल्याप्रमाणे बळकट आहे आणि अशा प्रकारच्या दुःखाने देह व्याप्त झाला असतांना देखील ज्याअर्थी तो विदीर्ण होऊन पृथ्वीवर पडत नाही, त्याअर्थी मरण अकाली कोणाला येत नाही, हेच निश्चित आहे. ४९८ स्निग्धस्य भजमानस्य युक्तमर्थाय कल्पितुम् ॥७।२५।४९
प्रेमाने आपल्याजवळ येणान्याच्या उपयोगी पडणे योग्य आहे. ४९९ स्वर्गों धनं वा धान्यं वा विद्याः पुत्राः सुखानि च । ___ गुरुवृत्त्यनुरोधेन न किंचिदपि दुर्लभम् ॥ २॥३०॥३६
( राम सीतेला म्हणतो. ) वडिलांच्या तंत्राने वागणाऱ्याला स्वर्ग, धन, धान्य, विद्या, पुत्र आणि सुख ह्यांपैकी काहींच दुर्लभ नाही. ५०० स्वामिना प्रतिकूलेन प्रजास्तीक्ष्णेन रावण ।
रक्ष्यमाणा न वर्धन्ते मृगा गोमायुना यथा ॥३॥४१।१४ (मारीच रावणाला म्हणतो.) व्याध रक्षण करीत असतांना ज्याप्रमाणे मृग वृद्धिंगत होत नाहीत, त्याचप्रमाणे प्रतिकूल आणि उग्र असा राजा रक्षण करीत असतांना प्रजेची भरभराट होत नाही.
For Private And Personal Use Only