________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४९२ सुहृदामर्थकृच्छ्रेषु युक्तं बुद्धिमता सदा।
समर्थेनोपसंदेष्टुं शाश्वती भूतिमिच्छता ॥६।१७।३३ ( राम वानरांना म्हणतो.) मित्रांचा निरंतर अभ्युदय व्हावा, अशी इच्छा करणाऱ्या बुद्धिमान् व विचारसमर्थ पुरुषानें, कार्याकार्याविषयीं संदेह प्राप्त झाला असतां, मित्रांना उपदेश करणे सर्वदा योग्यच आहे. ४९३ सूक्ष्मः परमविज्ञेयः सतां धर्मःप्लवङ्गम ।
हृदिस्थः सर्वभूतानामात्मा वेद शुभाशुभम् ॥४।१८।१५ (राम वालीला म्हणतो.) हे वानरा, सज्जनांचा धर्म सूक्ष्म असल्यामुळे तो इतरांना समजणे अत्यंत अशक्य आहे. प्राणिमात्राच्या हृदयामध्ये वास करणारा परमात्मा मात्र प्राण्यांचें पापपुण्य जाणीत आहे. ४९४ सौमित्रे योऽभिषेकार्थे मम संभारसंभ्रमः ।
अभिषेकनिवृत्त्यर्थे सोऽस्तु संभारसंभ्रमः ॥ २२२२१५ (राम म्हणतो.) हे लक्ष्मणा, माझ्या अभिषेकाचं सामान जितक्या त्वरेनें जुळविण्यांत आले आहे, तितक्या त्वरेनें वनवासाला जाण्याच्या सामग्रीची तयारी झाली पाहिजे. ४९५ स्त्रिया भर्ता हि दैवतम् ।। २।३९।३१
पति म्हणजे स्त्रियांचे दैवतच होय. ४९६ स्त्रीणां पवित्रं परमं पतिरेको विशिष्यते ॥२॥३९।२४
स्त्रियांना पति हेच उत्कृष्ट पुण्यसाधन आहे, स्त्रीला इतर सर्व पुण्यसाधनांपेक्षां पति अधिक आहे.
For Private And Personal Use Only