________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि ___९७ ४५८ श्रूयते हि द्रुमः कश्चिच्छेत्तव्यो वनजीवनैः ।
संनिकर्षादिषीकाभिर्मोचितः परमाद्भयात् ॥ २८॥३० (मंथरा कैकेयीला म्हणते.) वनामध्ये उपजीविका करणाऱ्यांना एक वृक्ष तोडावयाचा होता; परंतु त्याच्या भोवताली असलेल्या कांटेरी झुडपांनी त्या पराकाष्ठेच्या तोडण्याच्या भीतीपासून त्या वृक्षाला मुक्त केलें असें ऐकण्यांत आहे. ४५९ षट्पादतन्त्रीमधुराभिधानं
प्लवङ्गमोदीरितकण्ठतालम् । आविष्कृतं मेघमृदङ्गनादै
वनेषु संगीतमिव प्रवृत्तम् ॥ ४॥२८॥३६ (राम लक्ष्मणाजवळ वर्षाकालाचे वर्णन करितो. ) वनामध्ये आज गायन सुरू झाल्यासारखे वाटत आहे. कारण भंग गुंजारव करीत असल्यामुळे तंतुवाद्यांच्या मधुरध्वनीचा भास होत आहे, बेडूक शब्द करीत असल्यामुळे कोणी गवईच आपल्या कंठांतून तालसूर काढीत असल्यासारखे भासत आहे. आणि मेघांची गर्जना चालू असल्यामुळे मृदंगवादनच सुरू असल्याचा भास होत आहे. ४६० संश्रुत्य च न शक्ष्यामि जीवमानः प्रतिश्रवम् ।
मुनीनामन्यथाकतु सत्यमिष्टं हि मे सदा ॥३।१०।१७ ( राम सीतेला म्हणतो.) एकदां जी मुनींच्या जवळ प्रतिज्ञा केली, त्या प्रतिज्ञेचे जिवांत जीव आहे तोपर्यंत माझ्याने उल्लंघन होणे शक्य नाही. ४६१ सक्तं ग्राम्येषु भोगेषु कामवृत्तं महीपतिम् ।
लुब्धं न बहु मन्यन्ते श्मशानाग्निमिव प्रजाः॥३॥३३॥३ जो राजा ग्राम्य विषयांचे ठिकाणी आसक्त होऊन मनास येईल, तसें वर्तन करणारा आणि लोभी असतो, त्यास प्रजा स्मशानांतील अग्नीप्रमाणे अनादरणीय समजतात.
रा. सु. ७
For Private And Personal Use Only