________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४५३ शोकश्च किल कालेन गच्छता ह्यपगच्छति ।
मम चापश्यतः कान्तामहन्यहनि वर्धते ॥ ६।५।४ (राम लक्ष्मणाला म्हणतो.) काल जसजसा जातो, तसतसा शोक खरोखर कमी होत असतो. परंतु सीता दृष्टीस पडत. नसल्यामुळे माझा शोक तर दिवसेंदिवस वाढत आहे. ४५४ शोकः सर्वार्थनाशनः ॥ ६।२१७
शोक हा सर्वार्थांचा नाशक आहे. ४५५ शोकेनाभिप्रपन्नस्य जीविते चापि संशयः ॥ ४७१३
शोकानें मनुष्य व्याप्त झाला असता जीविताविषयीं देखील संशय उत्पन्न होत असतो. ४५६ शोको नाशयते धैर्य शोको नाशयते श्रुतम् ।
शोको नाशयते सर्व नास्ति शोकसमो रिपुः।।२।६२।१५. शोक धैर्याचा नाश करितो, शोक (शिकलेल्या) शास्त्रविद्येचा नाश करितो, शोक सर्वांचा नाश करितो. म्हणून शोकासारखा दुसरा शत्रु नाही. ४५७ शोच्यस्त्वमसि दुर्बुद्धे निन्दनीयश्च साधुभिः ।
यस्त्वं स्वजनमुत्सृज्य परभृत्यत्वमागतः ॥ ६१८७/१३ (इंद्रजित् बिभीषणाला म्हणतो.) हे दुर्बुद्धे, ज्याअर्थी स्वजनांचा त्याग करून तूं परक्यांचा दास झाला आहेस, त्याअर्थी तुझी स्थिति शोचनीय झाली असून तूं सज्जनांच्या निदेस पात्र झाला आहेस.
For Private And Personal Use Only