________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
ranAN
सार्थश्रीरामायणसुभाषितानि ३४३. मत्ता गजेन्द्रा मुदिता गवेन्द्रा
वनेषु विक्रान्ततरा मृगेन्द्राः। रम्या धरेन्द्रा निभृता नरेन्द्राः
प्रक्रीडितो वारिधरैः सुरेन्द्रः ॥ ४।२८१४३ (वर्षाकालाचे वर्णन.) वनामध्ये जिकडे तिकडे गजेंद्र मत्त झाले आहेत, मोठमोठे वृषभ आनंदित झाले आहेत, सिंह आपला पराक्रम जास्त जास्तच गाजवू लागले आहेत, पर्वत रमणीय दिसू लागले आहेत, राजे लोक स्वस्थ बसले आहेत आणि देवराज इंद्र मेघांच्या योगानें कीडा करीत बसला आहे. ३४४ मदङ्गे जीर्णतां यातु यत्त्वयोपकृतं कपे।
नरः प्रत्युपकाराणामापत्स्वायाति पात्रताम् ॥७॥४०।२४ (राम मारुतीला म्हणतो.) हे कपे, तूं केलेले उपकार माझ्या आंगीं जिरून जावोत. ( तुझ्या उपकारांची फेड तुझ्यावर तसा प्रसंग येऊन माझ्या हातून न होवो.) मनुष्य संकटकालीं उपकारांच्या फेडीला पात्र होत असतो. (तुझे उपकारांचे ओझें मजवर जशाचे तसें राहणार.) ३४५ मनो हि हेतुः सर्वेषामिन्द्रियाणां प्रवर्तने ।
शुभाशुभास्ववस्थासु तच्च मे सुव्यवस्थितम्।।५।११।४३ (सीतेचा शोध लावण्यासाठी रावणाचे अंतःपुर पाहिल्यावर मारुति म्हणतो.) बऱ्या वाईट स्थितीमध्ये कोणत्याही इंद्रियाची प्रवृत्ति होण्याचे कारण मन हेच आहे. आणि ते माझें मन तर अगदी स्वस्थ आहे. ३४६ मन्त्रमूलं च विजयं प्रवदन्ति मनस्विनः ६६।५ __ जय मसलतीवर अवलंबून असतो, असे विचारी लोक म्हणत
असतात.
For Private And Personal Use Only