________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
३३४ भगवन्प्राणिनां नित्यं नान्यत्र मरणाद्धयम् ॥७।१०।१६
(रावण ब्रह्मदेवाला म्हणतो.) हे भगवन्, प्राण्यांना नेहमी मरणापेक्षा दुसरे कशाचेही भय नाही. ३३५ भर्ता तु खलु नारीणां गुणवान्निर्गुणोऽपि वा ।
धर्म विमृशमानानां प्रत्यक्षं देवि दैवतम् ॥ २॥६२।८ (दशरथ कौसल्येला म्हणतो. ) हे देवि, पति गुणवान असो, वा निर्गुण असो; धर्माने चालणान्या स्त्रियांचें तो खरोखर प्रत्यक्ष दैवत आहे. ३३६ भर्ता नाम परं नार्याः शोभनं भूषणादपि ।५।१६।२६
अलंकारापेक्षाही पति हे स्त्रियांचे परम सुंदर भूषण आहे. ३३७ भतुरिच्छा हि नारीणां पुत्रकोट्या विशिष्यते ॥२॥३५।८
पतीच्या इच्छेला अनुसरून वागणे हे, स्त्रियांना एक कोटि पुत्र प्राप्त होण्यापेक्षाही अधिक आहे. ३३८ भर्तुर्भक्तिं पुरस्कृत्य रामादन्यस्य वानर ।
नाहं स्प्रष्टुं स्वतो गात्रमिच्छेयं वानरोत्तम ॥५॥३७६२ यदहं गात्रसंस्पर्श रावणस्य गता बलात् ।
अनीशा किं करिष्यामि विनाथा विवशा सती ५।३७।६३ (सीता मारुतीला म्हणते. ) हे वानरा, हे वानरश्रेष्ठा, भर्त्याच्या ठिकाणी अतिशयच भक्ति असल्यामुळे त्या रामावांचून दुसऱ्या कोणाच्याही शरीराला आपण होऊन स्पर्श करण्याची माझी इच्छा नाही. रावणाच्या शरीराचा स्पर्श मला झाला आहे; परंतु तो माझ्या इच्छेविरुद्ध झाला आहे. मी अनाथ, स्वतः असमर्थ आणि पराधीन असल्यामुळे करणार काय ?
For Private And Personal Use Only