________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
३२० प्राप्स्यामि यानद्य गुणान्को मे श्वस्तान्प्रदास्यति । __ अपक्रमणमेवातः सर्वकामैरहं वृणे ॥२॥३४।४० (राम दशरथाला म्हणतो, ठरल्याप्रमाणे वनांत गेलो असतां) आज जे गुण मला प्राप्त होतील, ते मला उद्यां कोण देणार आहे ? येथून गमन करणे यांतच माझे सर्व मनोरथ परिपूर्ण होत आहेत, यासाठी आजच्या आज वनवासाला जाणे हेच मला पसंत आहे. ३२१ प्रासादाग्रे विमानैर्वा वैहायसगतेन वा
सर्वावस्थागता भर्तुः पादच्छाया विशिष्यते।।२।२७९ (सीता रामाला म्हणते. ) कोणतीही अवस्था प्राप्त झाली तरी स्त्रीने पतिचरणांच्या छायेला असणेंच-राजवाड्यांत राहण्यापेक्षा, विमानांत बसून फिरण्यापेक्षां अथवा सिद्धि प्राप्त झाल्यामुळे आकाशमार्गानें गमन करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे. ३२२ प्रियं चेद्भरतस्यैतद्रामप्रव्राजनं भवेत् ।
मा स्म मे भरतः कार्षीत्प्रेतकृत्यं गतायुषः ॥२।१२।९२ (दशरथ म्हणतो.) रामाचा वनवास जर भरताला प्रिय असेल, तर मी मृत झाल्यावर माझें उत्तरकार्य त्याने करूं नये. ३२३ प्रैष्यं पापीयसां यातु सूर्यं च प्रति मेहतु ।
हन्तु पादेन गां सुप्तां यस्यार्योऽनुमते गतः॥२।७५।२२ (रामाला वनांत पाठविणान्यास भरताचे शिव्याशाप.) ज्याच्या अनुमतीने श्रेष्ठ राम वनवासाला गेला, त्याला अत्यंत पापी जनांची सेवा करणे भाग पडो. त्यास सूर्याचे पुढे मूत्र केल्याचे पाप लागो; तसेंच निद्रिस्त गाईला लाथ मारल्याचे पाप त्याच्या आंगीं जडो.
For Private And Personal Use Only