________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
३१६ प्रधानं साधकं वैद्यं धर्मशीलं च राक्षस ।
ज्ञातयोऽप्यवमन्यन्ते शूरं परिभवन्ति च ॥ ६।१६।४ (रावण बिभीषणाला म्हणतो.) हे राक्षसा, आपल्या कुलामध्ये श्रेष्ठ पदास चढलेला, राज्यरक्षण वगैरे करणारा, ज्ञानी आणि धर्मशील असा जरी कोणी असला, तरी भाऊबंद त्याचा अपमान करीत असतात. आणि तो जरी शूर असला तरी छिद्र पाहून त्याचा पराजय करीत असतात. ३१७ प्रवादःसत्यमेवायं त्वां प्रति प्रायशो नृप ।
पतिव्रतानां नाकस्मात्पतन्त्यश्रूणि भूतले॥६।११११६६ (रावणवधामुळे विलाप करणारी मंदोदरी रावणाला उद्देशून म्हणते.) हे राजा, ‘पतिव्रता स्त्रियांचे अश्रु कांहीतरी अनर्थ ओढवल्यावांचून विनाकारण कधीहि भूमीवर पडत नाहीत' अशी जी लोकांमध्ये म्हण आहे, ती तुझ्या संबंधाने खरी ठरली. ३१८ प्रशमश्च क्षमा चैव आर्जवं प्रियवादिता ।
असामर्थ्यफला ह्येते निर्गुणेषु सतां गुणाः॥६२१।१४ शांति, क्षमा, सरलपणा, प्रियवादित्व हे सज्जनांचे गुण निर्गुण पुरुषांच्या ठिकाणी निरुपयोगी होतात. ३१९ प्राप्तचारित्रसंदेहा मम प्रतिमुखे स्थिता ।
दीपो नेत्रातुरस्येव प्रतिकूलासि मे दृढा ॥६।११५/१७ ( राम सीतेला म्हणतो.) ज्याप्रमाणे नेत्ररोगी पुरुषाला दिवा अतिशय प्रतिकूल होत असतो, त्याप्रमाणे माझ्या समोर असलेली तूं, तुझ्या वर्तनासंबंधाने संशय उत्पन्न झाल्यामुळे माझ्या दृष्टीला अतिशय प्रतिकूल झाली आहेस.
रा. सु. ५
For Private And Personal Use Only