________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
१७० दुःखे मे दुःखमकरोत्रंणे क्षारमिवाददाः।
राजानं प्रेतभावस्थं कृत्वा रामं च तापसम् ॥२।७३३ (भरत कैकेयीला म्हणतो) राजाला ठार मारून व रामाला तपस्वी करवून, व्रणावर क्षाराचे सिंचन करावे, त्याप्रमाणे तूं माझ्या दुःखावर दुःखाची डागणी दिली आहेस. १७१ दुर्बलस्य त्वनाथस्य
राजा भवति वै बलम् ॥ ७.५९ प्र. ३२२२ दुर्बल व अनाथ यांचे बल म्हटले म्हणजे राजा होय. १७२ दुर्लभं हि सदा सुखम् ॥ २।१८।१३
नेहमी सुख मिळणे म्हणजे दुर्लभ आहे. १७३ दुर्लभस्य च धर्मस्य जीवितस्य शुभस्य च ।
राजानो वानरश्रेष्ठ प्रदातारो न संशयः॥४।१८।४२ ( राम वालीला म्हणतो ) हे वानरश्रेष्ठा, दुर्लभ धर्म, जीवित आणि कल्याण यांची (प्रजेला ) प्राप्ति करून देणारे राजेच आहेत. यांत संशय नाही. १७४ दुःशीलः कामवृत्तो वा धनैर्वा परिवर्जितः।
स्त्रीणामार्यस्वभावानां परमं दैवतं पतिः ॥२।११७।२४ वाईट आचरणाचा, स्वेच्छाचारी किंवा धनहीन असा जरी पति असला, तरी तो सुस्वभावी स्त्रियांना परम देवतच होय. १७५ दृश्यमाने भवेत्प्रीतिः सौहृदं नास्त्यदृश्यतः।
नाशयन्ति कृतघ्नास्तु न रामो नाशयिष्यति।।५।२६।३९ (लंकेमध्ये कारागृहांत पडलेली सीता विचार करते ) दृष्टीसमोर असलेल्या मनुष्याचे ठिकाणी प्रेम कायम असते. तेंच मनुष्य दृष्टीआड झाले असता त्याच्यासंबंधानें प्रेम कायम रहात नाही. परंतु (सांप्रत असेही म्हणता येणार नाही.) कारण कृतघ्न पुरुष दृष्टीआड झालेल्या मनुष्यावरील प्रेम नाहींसें करतात, तसें राम करणार नाही.
For Private And Personal Use Only