________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
१६५ दण्ड एव परो लोके पुरुषस्येति मे मतिः।
धिक्क्षमामकृतज्ञेषु सान्त्वं दानमथापि वा॥६।२२।४६ (नल वानर रामाला म्हणतो अकृतज्ञ अनुपकारी पुरुषाला) दंड करणे, ही गोष्ट पुरुषाची मोठी कार्यसिद्धि घडवून आणणारी आहे, असे मला वाटते. कृतघ्नाला क्षमा करणे, सामोपचाराच्या गोष्टी सांगणे, किंवा दान करणे, हे धिक्कारास्पद आहे. १६६ दद्यान्न प्रतिगृह्णीयात्सत्यं ब्रूयान्न चानृतम् ।
अपि जीवितहेतोहि रामः सत्यपराक्रमः ॥ ५।३३।२५ (लंकेमध्ये अशोक वनांत सीता दृष्टीस पडल्यावर तिच्यापुढे मारुतीने श्रीरामचंद्राचे गुण वर्णन केले) सत्यपराक्रमी राम दान करील, प्रतिग्रह करणार नाहीं; सत्यभाषण करील, असत्य बोलणार नाही. किंबहुना जीविताचाही त्याग करील, परंतु सत्य सोडणार नाही. १६७ दीनो वा राज्यहीनो वा यो मे भर्ता स मे गुरुः ।
तं नित्यमनुरक्तास्मि यथा सूर्य सुवर्चला ॥ ५।२४।९ (सीता रावणाला म्हणते ) माझा भर्ता, मग तो दीन असो, अगर राज्यहीन असो, तो मला पूज्य आहे. ज्याप्रमाणे सूर्यपत्नी सुवर्चला सूर्याचे ठिकाणीं अनुरक्त असते, त्याप्रमाणे मी नेहमी त्या रामाचेच ठिकाणीं अनुरक्त आहे. १६८ दीप्तमग्निमरण्यं वा यदि रामः प्रवेक्ष्यति ।
प्रविष्टं तत्र मां देवि त्वं पूर्वमवधारय ॥ २।२१।१७ (लक्ष्मण कौसल्येला म्हणतो ) हे देवि, प्रज्वलित अग्नीत, अथवा अरण्यांत जर राम प्रवेश करील, तर त्याच्या आधीच मी त्या ठिकाणी प्रवेश करीन हे तूं पक्के समज.. १६९ दुःखितः सुखितो वापि सख्युनित्यं सखा गतिः४।८।४० दुःखी असो, अगर सुखी असो, मित्राला मित्रच गति होय.
For Private And Personal Use Only