SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 211
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सार्थश्रीरामायणसुभाषितानि ५६ आढ्यो वापि दरिद्रो वा दुःखितः सुखितोऽपि वा। निर्दोषश्च सदोषश्च वयस्यः परमा गतिः॥४।८८ श्रीमंत असो, वा दरिद्री असो; सुखी असो वा दुःखी असो; निर्दोष असो, वा सदोष असो, मित्र म्हणजे परम गति होय. ५७ आत्मप्रशंसिनं दुष्टं धृष्टं विपरिधावकम् । सर्वत्रोत्सृष्टदण्डं च लोकः सत्कुरुते नरम् ॥६।२१।१५ आत्मप्रशंसा करणारा, दुष्ट आचरणाचा, साहसी, आपल्या प्रसिद्धीकरितां धांवपळ करणारा, व सर्वत्र दंड करीत जाणारा, अशाच पुरुषाचा लोक सत्कार करितात. ५८ आत्मानं नियमैस्तैस्तैः कर्षयित्वा प्रयत्नतः। प्राप्यते निपुणधर्मो न सुखाल्लभते सुखम् ॥३।९।३१ (धर्मसंपादनार्थ जे जे नियम सांगितले आहेत ) त्या त्या नियमांच्या योगेंकरून प्रयत्नांनों शरीर झिजवून शहाणे लोक धर्माची प्राप्ति करून घेतात. कारण, सुखापासून सुख मिळत नसते. ( कष्ट करून सुख मिळवावे लागते.) ५९ आत्मानमनुशोच त्वं किमन्यमनुशोचसि । आयुस्तु हीयते यस्य स्थितस्याथ गतस्य च।।२।१०५।२१ ( राम भरताला म्हणतो) तूं आपल्याविषयीं शोक कर. दुसऱ्याविषयी काय म्हणून शोक करितोस ? कोणी मनुष्य, मग तो उभा असो, किंवा चालणारा असो त्याचे आयुष्य क्षीण होत असते. ६० आत्मा रक्ष्यः प्रयत्नेन ॥ ५।४६।१६ । (प्रत्येकानें ) प्रयत्नपूर्वक स्वदेहाचे रक्षण करावें. ६१ आत्मा हि दाराः सर्वेषा दारसंग्रहवर्तिनाम् ॥ २॥३७।२४ प्रत्येक विवाहित पुरुषाची स्त्री हा त्याचा आत्माच आहे. For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy