________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
20
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि १५ अति धर्माद्धलं मन्ये बलाद्धर्मः प्रवर्तते ।
बले प्रतिष्ठितो धर्मो धरण्यामिव जङ्गमम् १२।१३४।६ बल हे धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण, बलापासूनच धर्माची प्रवृत्ति होते. सर्व जंगम पदार्थ ज्याप्रमाणे पृथ्वीच्या आधाराने राहतात, त्याप्रमाणे बलाच्या आधारानेच धर्म राहतो. १६ अतियोगमयोगं च श्रेयसोऽर्थी परित्यजेत् ॥१२॥२८७।२४
कल्याणाची इच्छा करणाऱ्या मनुष्याने [ आहारविहारादिकांचें ] अतिशय सेवन करणे व मुळीच सेवन न करणे या दोहोंचाहि सर्वथा त्याग करावा. १७ अतीतेष्वनपेक्षा ये प्राप्तेष्वर्थेषु निर्ममाः।।
शौचमेव परं तेषां येषां नोत्पद्यते स्पृहा ।।१३।१०८।१० द्रव्य नष्ट झाले असतां जे शोक करीत नाहीत, व प्राप्त झाले असता त्याच्या ठिकाणी जे आसक्त होत नाहीत, आणि ज्यांच्या अंतःकरणांत लोभ उत्पन्नच होत नाही ते अत्यंत शुचिभूर्तच होत. १८ अतो हास्यतरं लोके किंचिदन्यन्न विद्यते ।
यत्र दुर्जनमित्याह दुर्जनः सज्जनं स्वयम् ॥ १।७४।९५ स्वतः दुर्जन असलेल्याने उलट सन्जनालाच दुर्जन म्हणावें, यापेक्षा जगांत अधिक हास्यास्पद गोष्ट दुसरी कोणतीच नसेल ! १९ अथवा जायमानस्य यच्छीलमनुजायते ।
श्रूयते तन्महाराज नामृतस्यापसपेति ॥ ३।८११ ( व्यास महर्षि धृतराष्ट्र राजाला म्हणतात ) हे राजा, प्राणी जन्मतःच जो स्वभाव बरोबर घेऊन येतो, तो मरेपर्यंत त्याला सोडून जात नाही असें ऐकण्यांत येते. २० अथवा वसतो राजन्वने वन्येन जीवतः ।
द्रव्येषु यस्य ममता मृत्योरास्ये स वर्तते ॥ १२।१३।१० (सहदेव धर्मराजाला म्हणतो) हे राजा, वनांत राहून कंदमूळांवर उपजीविका करीत असतांनाहि ऐहिक वस्तूंविषयी ज्याला ममत्वबुद्धि वाटते, तो खरोखर मृत्यूच्या जबड्यांत पडला आहे असे समजावें.
For Private And Personal Use Only