________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
९ अचिन्त्याः खलु ये भावा न तांस्तर्केण साधयेत् ।
प्रकृतिभ्यः परं यत्तु तदचिन्त्यस्य लक्षणम् ॥ ६।५।१२ मनाला अचिंत्य असलेल्या अशा ज्या गोष्टी त्यांचा निर्णय केवळ युक्तिवादाने होणे शक्य नाही. प्रकृतीच्या--म्हणजे पंचमहाभुते, मन, बुद्धि व अहंकार या मूलतत्त्वांच्या पलीकडे असलेल्या वस्तूला (आत्मतत्त्वाला ) अचिंत्य असे म्हणतात. १० अज्ञश्वाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।
नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः॥६२८४० __ अज्ञ असून श्रद्धा न ठेवणारा असा संशयखोर मनुष्य सर्वथा नाश पावतो, अशा संशयात्म्याला ना इहलोक, ना परलोक, ना सुख. ११ अज्ञानतिमिरान्धस्य लोकस्य तु विचेष्टतः।
ज्ञानाञ्जनशलाकाभिर्नेत्रोन्मीलनकारकम् ॥ १।११८४ अज्ञानांधकाराने डोळ्यांवर झापड येऊन धडपडणाऱ्या लोकांच्या डोळ्यात ज्ञानरूपी अंजन घालून त्यांना दिव्य दृष्टि देणारें [ असें हैं महाभारत आहे. ]
१२ अज्ञानेनावृतो लोकः ।। ३।३१३१८२ लोक अज्ञानांत गुरफटलेले आहेत. १३ अञ्जलिः शपथः सान्त्वं शिरसा पादवन्दनम् ।
आशाकरणमित्येवं कर्तव्यं भूतिमिच्छता ॥ १११४०६७ हात जोडणे, शपथ घेणे, मधुर भाषण करणे, पायांवर डोके ठेवणे, लालूच दाखविणे या सर्व गोष्टी उत्कर्षेच्छु पुरुषाने केल्या पाहिजेत. १४ अतिक्रान्तं हि यत्कार्य पश्चाच्चिन्तयते नरः। । तचास्य न भवेत्कार्य चिन्तया च विनश्यति ॥८।३१२९
गोष्ट होऊन गेल्यानंतर तिच्याविषयों जो मागाहून चिंता करीत बसतो त्याचे तें कार्य तर होत नाहीच, पण चिंतेने नाश मात्र होतो.
For Private And Personal Use Only