________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१०८
सार्थ श्रीमहाभारत सुभाषितानि
६७३ मधु यः केवलं दृष्ट्रा प्रपातं नानुपश्यति ।
स भ्रष्टो मधुलोभेन शोचत्येवं यथा भवान् ।। ११।१।३७ ( भारती युद्धानंतर संजय घृतराष्ट्राला म्हणतो ) ज्याला तुटलेल्या कड्यास लटकणारे मधाचे पोळें मात्र दिसतें, पण तो तुटलेला कडा दिसत नाहीं, तो मधाच्या लोभानें पुढें जाऊन खालीं घसरतो आणि हल्लीं तूं शोक करीत आहेस असाच पश्चात्ताप करीत बसतो.
६७४ मन एव मनुष्यस्य पूर्वरूपाणि शंसति ।। १२/२२८/२
मनुष्याचा अभ्युदय किंवा हानि हीं पुढे व्हावयाची असली म्हणजे त्यांचीं पूर्वचिन्हें त्याचें मनच सांगत असतें.
६७५ मनसश्चेन्द्रियाणां चाप्यैकाग्र्यं परमं तपः ।
तज्ज्यायः सर्वधर्मेभ्यः स धर्मः पर उच्यते ।। १२/२५०/४
मन आणि इंद्रियें यांची एकाग्रता साध्य करणें हें फार मोठें तप आहे. ही एकाग्रता सर्व प्रकारच्या कर्माचरणापेक्षां श्रेष्ठ आहे. ती साध्य करणें हा श्रेष्ठ धर्म होय. ६७६ मनसो दुःखमूलं तु स्नेह इत्युपलभ्यते || ३|२/२७
मनाला दुःख होण्याचें मूळ कारण आसक्ति हॅच असल्याचे आढळून येतें. ६७७ मनुष्या ह्याढ्यतां प्राप्य राज्यमिच्छन्त्यनन्तरम् ।
राज्यादेवत्वमिच्छन्ति देवत्वादिन्द्रतामपि ।। १२।१८०।२४ खरोखर मनुष्यांना ऐश्वर्य प्राप्त झाले, म्हणजे त्यानंतर राज्य मिळविण्याची इच्छा होते. राज्य मिळालें कीं देवपद आणि देवत्वप्राप्तीनंतर इंद्रपदसुद्धां हवेंसें वाटू लागतें. ६७८ मन्यते कर्षयित्वा तु क्षमा साध्वीति शम्बरः ।
असंतप्तं तु यद्दारु प्रत्येति प्रकृतिं पुनः || १२|१०२।३१ शत्रूला जर्जर करून सोडल्यावर मग क्षमा केलेली चांगली, असें शंबराचें मत आहे. कारण तापविल्यावांचून वांकविलेले लाकूड पुनरपि पूर्वस्थितीस येते. ६७९ महत्त्वाद्भारवत्वाच्च महाभारतमुच्यते ।। १८/५/४५
या भारत ग्रंथाचें महत्त्व ( विस्तार ) आणि भार ( वजन ) फार असल्यामुळे यास महाभारत अशी संज्ञा प्राप्त झाली आहे.
For Private And Personal Use Only