________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि ६६९ भैषज्यमेतदुःखस्य यदेतन्नानुचिन्तयेत् ।
चिन्त्यमानं हि न व्येति भूयश्चापि प्रवर्धते ॥१२॥३३०११२ दुःखावर औषध हेच की त्याचे एकसारखे चिंतन करीत बसू नये. कारण, चिंतन केल्याने दुःख नाहींसें तर होत नाहीच, पण उलट अधिक वाढते मात्र. ६७० मनस्य व्यसने कृच्छे धृतिः श्रेयस्करी नृप ।।१२।२२७/३
धैर्येण युक्तं सततं शरीरं न विशीर्यते । विशोकता सुखं धत्ते धत्ते चारोग्यमुत्तमम् ॥१२।२२७४४
आरोग्याच शरीरस्य स पुनर्विन्दते श्रियम् ॥१२।२२७५ ( भीष्म युधिष्ठिराला सांगतात ) महत्संकटांत सांपडलेल्या मनुष्याने धीर धरणे श्रेयस्कर आहे. नेहमी धैर्य असले म्हणजे शरीराची हानि होत नाही. शोकाचा त्याग कल्याने सुख होते व त्यापासून उत्तम आरोग्य प्राप्त होते. आणि शरीर निरोगी राहिलें म्हणजे मनुष्य गेलेलें वैभव पुनः प्राप्त करून घेतो. ६७१ मद्यमांसपरस्वानि तथा दारा धनानि च ।
आहरेदागवशगस्तथा शास्त्रं प्रदर्शयेत् ।।१२।८८।२२ विषयाधीन झालेला मनुष्य मद्य, मांस, परस्त्री आणि परद्रव्य यांचा अपहार करील, आणि [ आपल्या दुष्कृत्याचे समर्थन करण्याकरितां ] तसा शास्त्रार्थहि काढून दाखवील. ६७२ मधुदोहं दुहेद्राष्ट्रं भ्रमरा इव पादपम् ।
वत्सापेक्षी दुहेच्चेव स्तनांश्च न विकुट्टयेत् ॥१२।८८४ भुंगा जसा झाडाला धका न लावतां फुलांतील मध तेवढा हळूच काढून घेतो त्याप्रमाणे राजाने प्रजेचें मन न दुखवितां तिजपासून कराच्या रूपाने द्रव्य ग्रहण करावें. अथवा, ज्याप्रमाणे गाईची धार काढणारा वासराला दूध राहील अशा बेतानें धार काढतो, आंचळ अगदी पिळून काढीत नाही. त्याप्रमाणेच राजाने प्रजेचें पोषण होईल अशा बेतानंच कर घ्यावा.
For Private And Personal Use Only