________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१५. आत्मस्वरूप
१. खरे म्हणजे ज्याप्रमाणे तिळामध्ये तेल किंवा फुलामध्ये
सुगंध परस्परामध्ये एकरूपच झाले आहेत; त्याचप्रमाणे
शरीर व जीवांच्या बाबतीत (ते एकरूप झाले आहेत). २. ज्याप्रमाणे स्निग्ध (म्ह. तेलकट) शरीरावर धूळ लागली
म्हणजे ती दिसतच नाही; त्याचप्रमाणे रागद्वेषाने स्निग्ध
बनलेल्या जीवामध्ये (बद्ध झालेले) कर्म (दिसून येत नाही). ३. ज्याप्रमाणे जीव जात असताना जेथे तो जातो (तिकडे) शरी
रही जाते; त्याप्रमाणे जीवाच्या आश्रयाने मूर्त कर्मही जात असते. ज्याप्रमाणे मोर उडताना पिसारा घेऊन जातो; त्याप्रमाणे
खरे म्हणजे कर्मसमूहासमवेत जीवही जातो. ५. ज्याप्रमाणे कोणी सामान्य मनुष्य स्वतः स्वयंपाक करून ते,
( अन्न ) जेवतो; त्याप्रमाणे जीवही स्वतःच केलेले कर्म स्वतः भोगतो. ज्याप्रमाणे विस्तीर्ण सरोवरात मंद वाऱ्याच्या झुळकीने हढ ( रोपटे ) फिरते, त्याप्रमाणे कर्माने आहत झालेला
जीव संसारसागरात भटकतो. ७. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य पडक्या घरातून बाहेर पडून नवीन
For Private And Personal Use Only