________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
आणि पुनः २४. मोरास कोण चितारतो ? (म्ह. मोरास चित्र विचित्र
सौंदर्य कोण देतो ? ) राजहंसांना (डौलदार) चाल कोण देतो? कमळांना कोण सुगंधित (करतो) ? कुलवान
(घराण्यात) जन्मलेल्यांना विनय कोण (शिकवतो) ? आणि तसेच २५. साळी (च्या लोंब्या कणसाच्या) भाराने, ढग पाण्याने,
झाडांचे शेंडे फळांच्या बहराने आणि सत्पुरुष विनयाने नम्र
होतात; ( पण ) खरोखर कोणाच्याही भीतीने नव्हे. २६. पानाचा विडा, (उत्तम) आसन, सन्मान, पारितोषिक,
आदर, इत्यादींनी अत्यधिक सत्कार केल्यामुळे प्रसन्न मनाने कुमार राजाजवळ बसला.
For Private And Personal Use Only