________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
(२५)
वासवदत्ता- तर मग खरोखर आता ती कोणाची अभिलाषा
करते ? दासी- उदयन नावाचे वत्स (देशाचे) महाराज आहेत. त्यांच्या
गुणावर राजकुमारी लुब्ध आहेत. वासवदत्ता-(स्वगत) आर्यपुत्र पती (व्हावा अशी) अभिलाषा
करते ? (उघड) कोणत्या कारणाने ? दासी- ते दयाळू आहेत म्हणून. वासवदत्ता- (स्वगत) माहित आहे, मला माहित आहे. याच
(गुणा ) मुळे मी त्यांच्यावर मोहित झाले होते. दासी- राजकुमारी, जर ते महाराज विद्रूप असतील - वासवदत्ता- नाही, नाही. (ते) सुंदरच आहेत. पद्मावती-आर्ये, आपण कसे जाणले ? वासवदत्ता-(स्वगत) आर्यपुत्राविषयीच्या पक्षपातामुळे मी मर्या.
देचे । श. चालरीतीचे) उल्लंघन केले. आता काय करावे ? असू देत. समजले (उघड) असे उजनीतील
लोक बोलतात. पद्मावती-(हे) जुळते. खरोखर हे उजैनीला अपरिचित नाहीत. सर्व लोकांच्या मनाला आनंददायक तेच खरे सौंदर्य.
(तेव्हा दाई प्रवेश करते ) . दाई-राजकुमारींचा विजय असो. राजकुमारी (आपणाला) दिले.
. (म्ह. आपला विवाह ठरला).. वासवदत्ता-आर्ये, कोणाला ? दाई-वत्स ( देशा ) च्या उदयनमहाराजांना. वासवदता आता त्या महाराजांचे कुशल आहे ना?
For Private And Personal Use Only