________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
८ पद्मावती उदयनास दिली
( नंतर दायी येते.) दासी-(अंतराळात) कुंजरिके, (अग) कुंजरिके, कोठे कोठे आहेत
राजकन्या पद्मावती ? ( ऐकल्याचा अभिनय करून ) काय म्हणालीस ? 'या राजकन्या माधवीलताकुंजापाशी चेंडूने खेळताहेत' म्हणून ? तोवर राजकुमारीपाशी जाते. (फिरून पाहून) अय्या ! कर्णफुले उंचावलेल्या, व्यायामाने निर्माण झालेल्या धर्मबिंदूंनी आकर्षक (श. चित्रविचित्र) झालेल्या आणि श्रमामुळे चेहरा मोहक दिसत असलेल्या या राजकन्या इकडेच येत आहेत. तोवर मी जवळ जाते. (जाते)
( असा प्रवेशक (संपतो) ) ( तेव्हा चेंडूने खेळत असलेली पद्मावती परिवारासमवेत वासवदत्तेसह प्रवेश करते) . वासवदत्ता-सखी, हा (घे) तुझा चेंडू. पद्मावती-आर्ये, आता एवढे (खेळणे पुरे) होऊ दे. वासवदत्ता-सखी, खूप वेळ चेंडूने खेळून अधिक आरक्त झालेले
तुझे हात जणू 'दुसन्यांचे' झाले आहेत. ( अतिशय लालसर झाल्यामुळे जणू ते तिचे नव्हेत कारण
For Private And Personal Use Only