________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
५६
अध्यात्मकल्पद्रुमाचें
पतंगादिकांचा प्रमादः - पतंग दृष्टिविषयानें अंध होऊन दीपशिखेवर झडप घालून स्वतःचा नाश करून घेतो. भ्रमर घ्राणेन्द्रियाच्या विषयाला लुब्ध होऊन कमलांत बद्ध होतो. हरिण शब्दविषयाच्या मोहानें व्याधाचे जाळ्यांत सांपडतो. रसनेन्द्रिय विषय लोलुप पक्षी जालबद्ध होऊन मृत्युमुखीं पडतात. कर्णेन्द्रियाच्या विषयाच्या योगानें मोहित झालेल्या सर्पाला गारुडी पकड़तात. रसनेन्द्रियाच्या विषयाच्या सेवनानें मत्स्य गळास अडकून प्राणास मुकतात. स्पर्शेन्द्रियाच्या विषयाचे लालसेनें हस्ती हस्तिनीच्याद्वारे बद्ध होऊन परतंत्र होतो. व्याम रसनेन्द्रियाच्या विषयाच्या प्रबल पाशांत सांपडून मृतिन्धादि दुःख अनुभवतो. श्लोक १३३ पहा.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
For Private And Personal Use Only