________________
७४ : आराधना-कथाकोष तद्वाक्य ऐकोनि श्रवणि । पाचारिले दासीलागुणि । नेत्रसंज्ञा दाखवोनि । मंत्रिचे सदनि पाठविलि ॥१७६।। दासि जावोनि मंत्रिस्त्रीप्रति । वदोनिया भोजनवृत्ति । पंचरत्न मागति । म्हने त्वत्पति मज धाडिले ॥१७७॥ मग मंत्रिभार्या वदे तीत । मत्स्वामि यवोनि गृहात । वस्त नेइल स्वकिय हात । ठावे मत असेचि ना ॥१७८।। तदा माघारे यवोनि दासी । हस्तसंज्ञा कथिले राज्ञिसि । तदा राज्ञी वदे प्रधानासि । दूतकर्मासि खेळु आता ॥१७९।। तदा तन्मुद्रिका जिंकुनि । दासी करि गुप्त देऊनि । पुन्हा धाडिल तत्सदनि । विज्ञानगुणि निपुन असे ॥१८०॥ मुद्रिका देवोनि तिचे करी । म्हने हे पाहोनि लौकरि । रत्नकरंड द्यावा मत्करि । मुद्रिका जरि असे वळखिली ।।१८१।। ऐसे ऐकोनि तद्वचन । तन्ही न दिधले रत्न । तदा दासी आलि फिरोन । संज्ञा करोन निवेदिले ॥१८२।। तदोपरि कर्त्तरिसहित । राज्ञिने जिकिले यज्ञोपवीत । पुन्हा पाठविले दासीत । मंत्रीचे गृहात सत्वरी ॥१८३।। यज्ञोपवीत दावोनि शीघ्र । म्हने तू दिससि अतिनिष्ठुर । बाइ तुझिया भ्रतारावर । होताति मार कोरड्याचे ॥१८४॥ बाइ ग त्या रत्नाचा धनि । फिर्यादा आला राजभुवनि । राजा पुसता धाक दाउनि । मंत्रि तत्क्षणि कबुलला ॥१८५॥ जरी त्याचे प्राणाचि आस । बाइय गे असे तुस । तरी शीघ्र देइ रत्नास । तव चित्तास येईल जरि ॥१८६॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org